Raghav Chadha news : भाजपमध्ये जाताच लाखो फॉलोअर्स गेले, टोकाची टीका; अखेर राघव चड्ढा यांच्याकडून गौप्यस्फोट, म्हणाले, तीन पर्याय...

AAP MPs join BJP, Raghav Chadha BJP move : एक व्यक्ती चुकीचा असू शकतो. पण सात खासदारांनी हा निर्णय घेतला आहे. सात जण चुकीचे असू शकत नाही, असेही राघव चड्ढा यांनी स्पष्ट केले.
Raghav Chadha, Nitin Nabin
Raghav Chadha, Nitin NabinSarkarnama
Published on
Updated on

AAP crisis news : राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी सहा खासदारांसह बंड करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा करताच आम आदमी पक्षासह अन्य विरोधी पक्ष तसेच सोशल मीडियातही त्यांच्यावर टोकाची टीका झाली. चड्ढा यांचे सोशल मीडियातील लाखो फॉलोअर्स कमी झाले. त्यानंतर अखेर चार दिवसांनी त्यांनी आपले मौन सोडले आहे.

राघव चड्ढा यांनी सोशल मीडियात एक व्हिडीओ पोस्ट आप सोडण्याची आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या भूमिकेचे समर्थन करताना त्यांनी म्हटले आहे की, आता आम आदमी पक्ष बदलला आहे. पूर्वीसारखा राहिला नाही. या पक्षामध्ये आता काम करण्यासाठीचे वातावरण विषारी बनले आहे. काम करण्यापासून, संसदेत बोलण्यापासून रोखले जात होते.

मी माझ्या तारूण्यातील १५ वर्षे पक्षाला दिली. माझे करिअर बनविण्यासाठी राजकारणात आलेलो नाही, असे सांगत चढ्डा यांनी ‘योग्य व्यक्ती पण चुकीच्या पक्षात’या उक्तीचा वापर करत भाजप प्रवेशाचे समर्थन केले. हा निर्णय़ घेण्याआधी आपल्यासमोर तीन पर्याय होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

Raghav Chadha, Nitin Nabin
Rajya Sabha news : मोठी बातमी : राघव चड्ढांना ‘आप’ धक्का देण्याच्या तयारीत, दुसरीकडे 7 खासदारांबाबत सभापतींनी घेतला सर्वात मोठा निर्णय

राजकारणातूनच बाहेर पडणे, पक्षात राहून बदल घडविणे आणि अन्य राजकीय पक्षात जाणे, हे तीन पर्याय होते. आपण तिसरा पर्याय निवडल्याचे चड्ढा यांनी स्पष्ट केले. एक व्यक्ती चुकीचा असू शकतो. पण सात खासदारांनी हा निर्णय घेतला आहे. सात जण चुकीचे असू शकत नाही, असेही चड्ढा यांनी स्पष्ट केले.

Raghav Chadha, Nitin Nabin
AAP MP Revolt : फुलप्रुफ प्लॅन, पण एका खासदाराने खबर दिली अन् बंडाच्या हालचालींना वेग; फोनाफोनी सुरू होताच सगळं गुप्तपणे झालं...

केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीमुळे सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची टीकाही होत आहे. त्यावर बोलताना चड्ढा म्हणाले, आपण कोणत्याही भीतीपोटी पक्ष सोडलेला नाही. आमचा पक्षात भ्रमनिरास झाला म्हणून पक्ष सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपमधून बाहेर पडलो याचा अर्थ तुमचे सार्वजनिक प्रश्न मांडणार नाही, असे नाही. मी लोकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडत राहीन, असे चड्ढा यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com