Raghav Chadha, parineeti chopra, Priyanka Chopra Sarkarnama
देश

Raghav Chadha controversy : 'बहिणीसाठी प्रियांका चोप्राची मध्यस्ती अन् राघव चड्ढा भाजपमध्ये...', नवजोत कौर सिद्धू यांचा खळबळजनक दावा

Navjot Kaur Sidhu Raghav Chadha : "अरविंद केजरीवाल यांच्यासोबत राघव चड्ढा यांचे मतभेद सुरु झाल्यानंतर चड्ढा यांच्यावर ईडीची छापेमारी होणार याची कल्पना आली होती. कारण केंद्राकडे ते एकच हत्यार आहे. शिवाय चड्ढा यांच्या मागे ईडी लागणार आहे याची कल्पना प्रियांका चोप्राला आली होती."

Jagdish Patil

Navjot Kaur Sidhu Claim : आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी 6 खासदारांसह आम आदमी पक्षाला अखेरचा राम राम केला आहे. त्यांनी या 6 खासदारांसह भाजममध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. कारण राघव चड्ढा यांनी यापूर्वी जनसामान्यांना सतत भेडसावणाऱ्या समस्यांवर आवाज उठवला होता.

शिवाय हे मुद्दे उपस्थित करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. मागील काही काळात त्यांनी 'भाजप म्हणजे गुंडाची टोळी' असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यानंतरही त्यांनी भाजपमध्येच प्रवेश केल्यामुळे ते ईडीच्या भीतीने भाजपमध्ये गेल्याची टीका आम आदमी पक्षाकडून केली जात आहे.

अशातच आता नवजोत सिंह सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे. "चड्ढा यांना भारतीय जनता पक्षात नेण्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा मोठा हात आहे.", असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

शिवाय चड्ढा यांच्यावर ईडीची छापेमारी होणार याची कल्पना त्यांना आली होती, अंसंही नवजोत कौर सिद्धू यांनी म्हटलं आहे. नवजोत कौर सिद्धू यांनी हे वक्तव्य एका युट्युब चॅनेलच्या पॉडकास्टमध्ये केलं आहे. या पॉडकास्टमध्ये राघव चड्ढा यांच्या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, "राघव चड्ढा यांना भाजपमध्ये नेण्यात आणि त्यांना ईडीच्या कारवाईपासून बचाव करण्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राचा मोठा हात आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यासोबत चड्ढा यांचे मतभेद सुरु झाल्यानंतर चड्ढा यांच्यावर ईडीची छापेमारी होणार याची कल्पना आली होती. कारण केंद्राकडे ते एकच हत्यार आहे." तर चड्ढा यांच्या मागे ईडी लागणार आहे याची कल्पना प्रियांका चोप्राला आली होती. आपली बहीण परिणीती चोप्राच्या पतीला वाचवण्यासाठी तिने मध्यस्थी करत त्यांना भाजपामध्ये सुरक्षित स्थान मिळवून दिलं, असा खळबळजनक दावा त्यांनी या पॉडकास्टमध्ये केला.

तसंच चड्ढा आणि केजरीवाल यांच्यात मागील काही दिवसांपासून मतभेद सुरू होते. ते पक्षाच्या बाजूने काहीच बोलत नाहीत, असं पक्षाला वाटायला लागलं होतं. त्यांनी साडेचार वर्षानंतर बोलायला सुरूवात केली. ते जे बोलत होते ते दीड वर्षापूर्वीच बोलायला पाहिजे होतं. मात्र, त्यावेळी तर तुम्ही मलाई खाण्यात व्यस्त होते आणि ते आपमधून बाहेर पडणार आहेत याची कल्पना आधीच आली होती, असंही नवजोत कौर सिद्धू यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT