Gokul Administrator : CM फडणवीसांनी अर्ध्या तासांतच संपवला 'गोकुळ'चा विषय : धनंजय महाडिकांकडे येणार सूत्र?

Gokul Administrator Decision : गोकुळ दूध संघावरील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ चार मे रोजी संपत आहे. कार्यकाळ संपताच दुसऱ्या दिवशी प्रशासक नेमण्याचे अधिकार नवीन कायद्यानुसार लागू पडतात. शिवाय राज्य सरकारकडून गोकुळ दूध संघाच्या कारभाराचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Gokul Politics
Gokul PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 29 Apr : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह गोकुळ दूध संघातील सत्ताधाऱ्यांकडून गोकूळ दूध संघावर प्रशासक येऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रात्री उशिरा झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघावर नव्या कायद्यातील तरतुदीनुसार सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक येणारच असे स्पष्ट केले.

त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या सत्ताधाऱ्यांसह नेत्यांना धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासक येऊ देणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र रात्री उशिरा झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रशासक येण्याचे स्पष्ट केल्याने सत्ताधाऱ्यांच्या पदरी निराशा आली.

गोकुळ दूध संघावरील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ चार मे रोजी संपत आहे. कार्यकाळ संपताच दुसऱ्या दिवशी प्रशासक नेमण्याचे अधिकार नवीन कायद्यानुसार लागू पडतात. शिवाय राज्य सरकारकडून गोकुळ दूध संघाच्या कारभाराचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर न्यायालय प्रक्रियेत १२०० सभासदांचा अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक सध्या तरी अनिश्चित काळासाठी प्रतीक्षेत आहे.

Gokul Politics
Fadnavis Visit to Deshmukh Home : देवेंद्र फडणवीसांची सुभाष देशमुखांच्या घरी अचानक भेट; देशमुख पिता-पुत्रांसोबत बंद दाराआड चर्चा

त्यामुळे गोकुळ मधील सत्ताधाऱ्यांचे नेते आणि अध्यक्ष संचालक मंडळ यांनी संघावर प्रशासक येऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या कामकाजा संदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. गोकुळ दूधसंघाच्या संचालकांना मुदतवाढ द्यावी किंवा अशासकीय प्रशासक नेमवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर केली.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी थेट नव्या कायद्यातील तरतुदीनुसार गोकुळ दूध संघाच्या सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक नेमला जाईल. शिवाय आवसायानात निघालेल्या ११०८ संस्थांची कायदेशीर चौकशी पूर्ण होऊ दे. तोपर्यंत प्रशासक नेमला जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान मुख्यमंत्र्यांची बैठक होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गोकुळच्या संचालक, अध्यक्ष आणि प्रमुख नेत्यांनी भेट घेतली.

Gokul Politics
Massajog Sarpanch Election: तळपत्या उन्हातही मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 84 टक्के मतदान; स्वरुपानंद की अश्विनी देशमुख, काही तासांतच निकाल लागणार

या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गोकुळ दूध संघावर प्रशासक येऊ नये याची ग्वाही दिली. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रशासक येणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा हिरमोड झाला. दरम्यान, गोकुळ दूध संघावर अप्रशासकीय प्रशासक आणण्याची मागणी भाजपच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केली. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची मागणी केल्याची सूत्रांकडून माहिती आहे. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com