Raghav Chadha news : आम आदमी पक्षाने गुरूवारी खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटविले आहे. त्यांच्या जागी पक्षाचे राज्यसभेचे दुसरे सदस्य अशोक मित्तल यांची वर्णी लागली आहे. पक्षाकडून तसे पत्र राज्यसभा सचिवालयाला देण्यात आले आहे. पण एवढेच नाही तर चढ्ढ यांना राज्यसभेत बोलण्यासाठी पक्षाचा वेळ देऊ नये, असेही या पत्रात म्हटल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
आपच्या या तकडाफकडी निर्णयाने चर्चांना उधाण आले आहे. चढ्ढा हे २०२२ पासून राज्यसबेचे खासदार असून २०२८ पर्यंत सदस्य असणार आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि प्रवक्तेही आहे. मागील काही महिन्यांपासून ते पक्षात फारसे सक्रीय नव्हते, पक्षाबाबत माध्यमांशी फारसे बोलत नव्हते. त्यांची भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा होती. त्यामुळेच ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.
राघव चढ्ढा यांना पक्षाने राज्यसभेत बोलण्यास मनाई केली असली तरी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी आधीच धडाका लावला होता. त्यांनी सर्वसामान्यांच्या अनेक जिव्हाळ्याच्या मुद्दयांना हात घालत आवाज उठविला आहे. त्याची देशभरातही बरीच चर्चा झाली.
मोबाईल रिचार्जचा चढ्ढा यांनी मांडलेला मुद्दा चांगलाच गाजला. पूर्ण कॅलेंडर महिन्यामध्ये ३० किंवा ३१ दिवस असताना कंपन्यांकडून केवळ २८ दिवसांचा डेटा दिला जातो. हे रिचार्ज पूर्ण महिन्यासाठी असावा. तसेच एखाद्या दिवशी डेटा संपला नाही, तर तो पुढील महिन्यांतही वापरता यावा, असा प्रस्ताव चढ्ढा यांनी मांडला आहे. देशातील कोट्यवधी मोबाईल ग्राहकांसाठी हा महत्वाचा मुद्दा आहे.
चढ्ढा यांनी बँकांकडून खात्यांमध्ये किमान रक्कम शिल्लक नसल्यास दंड आकारल्याच्या गंभीर मुद्दयावरही आवज उठविला होता. हा दंड रद्द करण्याची मागणी त्यांनी उचलून धरली होती. भारतात ‘पॅटर्निटी लिव्ह’ म्हणजेच मातृत्व रजेप्रमाणेच पितृत्व रजेलाही कायदेशीर अधिकार मिळावा, अशी मागणी केली. त्याची विशेष चर्चा झाली. मागील अनेक वर्षांपासून ही मागणी होत आहे.
त्याचप्रमाणे चढ्ढा यांनी राज्यसभेत खाद्यान्नामध्ये यूरिया आणि अन्य भेसळीसह विमानतळावरील महागडे पार्थ, विवाहित जोडप्यांसाठी एकत्र प्राप्तिकर फायलिंगचा पर्याय आदी मुद्देही जोरकसपणे मांडले होते. मागील हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी गिग वर्कर्सच्या कमी वेतनाची समस्या मांडली होती. त्यासाठी ते गिग वर्कर बनून स्वत: दिल्लीतील रस्त्यांवर फिरले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.