Congress MLA : भाजपच्या बड्या नेत्याला धूळ चारणाऱ्या काँग्रेसच्या आमदाराला 3 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षांपूर्वीचे प्रकरण भोवले, पद जाणार...

Rajendra Bharti case : भाजप नेते पप्पू पुजारी यांनी हे प्रकरण समोर आले होते. सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी केली होती. २०१५ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी भारती यांच्याविरोधात पहिल्यांदा पोलिसांत तक्रार केली होती.
BJP| Congress
BJP| CongressSarkarnama
Published on
Updated on

Bank scam India mla : मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळून आलेल्या आमदाराला कोर्टाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सुमारे २८ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आमदाराला चांगलेच भोवले आहे. मध्य प्रदेशातील दतियाचे आमदार राजेंद्र भारती हे भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत. त्यांना २ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्याने आमदारकी धोक्यात आली आहे.

दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने भारती यांना शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्यावरील आरोप सिध्द झाल्यानंतर कोर्टाने त्यांना बुधवारी दोषी धरले होते. तर गुरूवारी शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने लगेच त्यांना हायकोर्टात दाद मागण्यासाठी ३० दिवसांचा जामीनही मंजूर केला आहे. त्यामुळे भारती यांना तोपर्यंत तुरूंगात राहावे लागणार नाही.

राजेंद्र भारती यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. १९८५, १९९८ आणि २०२३ असे तीनवेळा त्यांनी दतिया विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. २०२३ च्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा पराभव केला होता. त्यावेळी त्यांच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. मिश्रा यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का होता.

BJP| Congress
Supreme Court : खळबळजनक घटना, अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले! सरन्यायाधीश प्रचंड संतापले, स्वत: मध्यरात्री 2 वाजेपर्यंत होते लक्ष ठेऊन...

भारती यांच्यासह बँक कर्मचाऱ्यालाही तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना प्रमुख आरोपी करण्यात आले होते. हे प्रकरण १९९८ चे आहे. त्यावेळी राजेंद्र भारती हे जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या आईच्या नावाने १० लाखांची एफडी काढली होती. त्यावर १३.५ टक्के व्याज मिळत होते. मात्र, भारती यांनी बेकायदेशीरपणे एफडीवरील व्याज प्रत्येकवर्षी काढून घेतले.

नियमानुसार एफडीतील रक्कम आणि व्याज त्याची मुदत संपल्यानंतर एकत्रितपणे मिळते. मात्र, भारती यांनी सलग तीन वर्षे परस्पर व्याजाचे पैसे काढले. बँकेतील अधिकाऱ्यांना हा घोटाळा लक्षात आल्यानंतर सरकार विभागात तक्रार करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी चौकशी झाली अन् भारती यांच्यासह बँकेतील एक कर्मचारीही दोषी आढळला. दरम्यानच्या काळात भारती आमदार म्हणून निवडून आले.

BJP| Congress
Assembly Election Voting : धक्कादायक : निवडणुकीत मध्यरात्री तब्बल 17 लाख मतदान; याच मतांमुळे विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचा दावा

भाजप नेते पप्पू पुजारी यांनी हे प्रकरण समोर आले होते. सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी केली होती. २०१५ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी भारती यांच्याविरोधात पहिल्यांदा पोलिसांत तक्रार केली. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. एमपी-एमएलएल कोर्टामध्ये सुरूवातीला ग्वाल्हेर येथे व ऑक्टोबर २०२५ मध्य दिल्लीतील कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com