Raghav Chadha Sarkarnama
देश

Raghav Chadha : भाजपच्या जवळ गेलेल्या राघव चढ्ढांचे केजरीवालांनी पंख छाटले? तडकाफडकी केलेल्या कारवाईमागील 3 धक्कादायक कारणे

reasons behind action on Raghav Chadha : राघव चड्ढा यांना AAP मधून काढले का? कारवाईमागील 3 धक्कादायक कारणे, राजकीय परिणाम आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या.

Rashmi Mane

आम आदमी पक्षाने राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता अशोक मित्तल यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंजाबमधून राज्यसभेत गेलेले राघव चड्ढा हे पक्षातील महत्त्वाचे आणि तरुण चेहरे मानले जात होते. मात्र अचानक झालेल्या या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या कारवाईमागे काही महत्त्वाची कारणे समोर येत आहेत. पहिलं कारण म्हणजे स्वाती मालिवाल प्रकरणापासून राघव चढ्ढा यांनी आम आदमी पक्षापासून अंतर ठेवलं होतं. तसेच दिल्लीतील आबकारी धोरण प्रकरण (शराब घोटाला) या प्रकरणात पक्षाचे वरिष्ठ नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया तुरूंगातून सुटल्यानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, कोणतेही ट्विट केले नव्हते. याची खूप चर्चा झाली होती. पक्षासाठी हा संवेदनशील मुद्दा असताना त्यांची शांत भूमिका अनेकांच्या लक्षात आली.

दुसरं कारण म्हणजे राज्यसभेतील कामकाज. पक्षाच्या वतीने दिलेल्या वेळेत राघव चड्ढा वारंवार बोलत असल्याची तक्रार होती. मागील काही दिवसांत राघव चढ्ढा यांनी राईट टू रिकॉल, जिओ, एअरटेल आणि व्हीआय या कंपन्यांवर विचारलेले प्रश्न, पॅटर्निटी लिव्ह अशा विषयांवर मुद्दे मांडले होते. हे सोशल मीडियामध्ये चर्चेचे ठरले होते. त्यामुळे इतर खासदारांना बोलण्याची संधी कमी मिळत असल्याचं सांगितलं जात आहे.राज्यसभेतील भाषणांमधून ते स्वतःचा पीआर वाढवत असल्याचं बोललं जात होतं. यामुळे पक्षात नाराजी निर्माण झाली होती.

तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षाच्या कामांमध्ये कमी सहभाग. गेल्या काही महिन्यांत राघव चड्ढा पक्षाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय दिसत नव्हते, असा आरोप केला जात आहे. त्याचवेळी राघव चढ्ढा यांची भाजपसोबत जवळीक वाढताना दिसत आहे. ते भाजपमध्ये जाणार अशा सोशल मीडियावर चर्चा होत्या. पक्षात अनेक घडामोडी होत असताना त्यांनी फारसं मत व्यक्त केलं नाही, याकडेही लक्ष वेधलं जात आहे.

आता या निर्णयानंतर राघव चड्ढा पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता त्यांच्या राजकीय प्रवासात पुढे काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT