Ashok Kharat case : अशोक खरातच्या जीवाला धोका? SIT ॲक्शन मोडमध्ये अन् कोर्टानेही दिली परवानगी

Ashok Kharat life threat SIT investigation details : अशोक खरात प्रकरणाला गंभीर वळण, जीवाला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर SIT ॲक्शन मोडमध्ये. पुढील तपासासाठी न्यायालयाची परवानगी.
Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants Permission
Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants PermissionSarkarnama
Published on
Updated on

नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्याला हादरवून टाकले आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आतापर्यंत भोंदू खरातवर 11 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 8 गुन्हे अत्याचार आणि लैंगिक शोषणाचे आहेत.

आता या संपूर्ण प्रकरणात वेगवान हलचाली सुरु आहेत. सुनावणीसाठी खरातला आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यात येणार होते, मात्र आता ही सुनावणी ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या जीवाला धोका असल्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर विशेष तपास पथकाने (SIT) न्यायालयाकडे याबाबत विनंती केली होती.

Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants Permission
Ashok Kharat Viral Video : SIT च्या हाती मोठं घबाड! अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय काय सापडलं?

खरातच्या सुरक्षेला प्राधान्य देत न्यायालयाने ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे त्याला कारागृहातून न्यायालयात नेण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सुनावणी पार पडणार आहे. या निर्णयामुळे पोलिस आणि प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.

याआधी पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तपास यंत्रणांनी दुसऱ्या गंभीर गुन्ह्यात त्याचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना परवानगी दिली.

यानंतर खरातला मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा SIT च्या ताब्यात देण्यात आले. या दरम्यान त्याच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी अधिक वेगाने सुरू आहे. विशेषतः लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणात तपास यंत्रणा अधिक पुरावे गोळा करत आहेत.

दरम्यान, खरातच्या जीवाला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर SIT ने न्यायालयाला लेखी स्वरूपात माहिती दिली होती. या पत्रात त्याच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने ऑनलाइन सुनावणीचा निर्णय घेतला.

Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants Permission
Ashok Kharat case full story : दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदू खरातचा 'काळा अध्याय' अखेर संपला! 10 दिवसांत नेमकं काय काय घडलं?

सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुढील सुनावणीत कोणते नवे तपशील समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. SIT चा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत महत्त्वाचे घडामोडी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com