Gujarat Election 2022 sarkarnama
देश

Gujarat Election 2022 : आपचा शोले स्टाईल प्रचार ; " सो जा बेटा, केजरीवाल तुम्हें जेल में डाल देगा,"

Gujarat Election 2022 : आम आदमी पक्षानेही भाजप आणि काँग्रेसला आव्हान दिले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP), काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षामध्ये (AAP) लढत असल्याचे चित्र आहे. प्रचाराची रणधुमाळी (Gujarat Assembly Election) सुरू झाली आहे.आम आदमी पक्षानेही भाजप आणि काँग्रेसला आव्हान दिले आहेत. भाजपकडून यंदा विक्रमी विजय मिळवण्याचा दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने परिवर्तन होणार असे म्हणत दंड थोपटले आहेत. (Gujarat Election 2022 latest news)

गुजरात विधानसभेसाठी आप पूर्ण ताकदीने लढत आहे. आपचे गुजरातचे प्रभारी, खासदार राघव चड्डा यांनी बुधवारी कांकरेज विधानसभा मतदार संघात प्रचार केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख करीत चड्डा यांनी खास शोले स्टाईल संवादाने सभा गाजवली.

राघव चड्डा म्हणाले, "भष्ट्राचारी नेता अरविंद्र केजरीवाल यांना घाबरत आहेत. भष्ट्राचारी नेत्यांची आई त्यांना सांगते, " सो जा बेटा सो जा वरना केजरीवाल आ जाएगा और तुम्हें जेल में डाल देगा," महागाई आणि भष्ट्राचार संपविण्यासाठी केजरीवाल यांचा जन्म झाला आहे,"

आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाळ इटालिया यांनी प्रचारासाठी गुजरातमध्ये मोठी तयारी केली आहे. ते स्वतः सुरत जिल्ह्यातील कतारगाम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. घरोघरी प्रचार करण्यावर ते भर देत आहेत.

मतदार हे आपला पसंदी दिली आहे. केजरीवाल यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. केजरीवाल यांच्याकडून गुजरातच्या जनतेला खूप अपेक्षा आहेत. आमचे पक्ष संघटन मजबूत असून जनता आम्हाला निवडणूक देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपसोबत आमची ठक्कर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT