Ajit Pawar : "अजितजी अभी बस, अभी मुझे जाना है," ; अजितदादांनी सांगितला 'तो' किस्सा

Ajit Pawar : सत्तारुढ मान्यवर यावर का गप्प बसतात हे महाराष्ट्राला पडलेलं कोड आहे,"
Ajit Pawar, Bhagat Singh Koshyari
Ajit Pawar, Bhagat Singh Koshyarisarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजितदादांनी ते उपमुख्यमंत्री असताना राज्यपालांना भेटले होते, तेव्हाचा किस्सा सांगितला. (Ajit Pawar latest news)

अजित पवार म्हणाले, " शिवाजी महाराजांवरील वक्तव्य सर्वांनाच चीड आणणारे होते. मी आजही या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार असं का बोलतात का वागतात ? आणि सत्तारुढ मान्यवर यावर का गप्प बसतात हे महाराष्ट्राला पडलेलं कोड आहे,"

Ajit Pawar, Bhagat Singh Koshyari
Ajit Pawar : बळीराजाला कोर्टात जाण्याची वेळ येऊ देऊ नका ; अजितदादांनी सरकारला खडसावले

"मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा कोश्यारी यांना भेटायला जायचो. मला बऱ्याचदा राज्यपाल म्हणायचे, "अजितजी अभी बस,अभी मुझे जाना है," "मी म्हणायचो वरिष्ठांना सांगा आणि जा," त्यांना जायचे आहे आणि मात्र वरिष्ठ परवानगी देत नाहीत. त्यामुळे राज्यपाल अशाप्रकारची वक्तव्य करत आहेत का ?, अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होत आहे," असा टोला त्यांनी लगावला.

बोलताना तारतम्य ठेवा

अजित पवार म्हणाले, "सध्या सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी कहरच केला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किंवा कोणाविषयी आपण काय बोलतो त्यावेळी बोलताना तारतम्य बाळगायला हवे. सत्ताधारी पक्षचं नाही तर विरोधी पक्ष आणि विविध राजकीय पक्ष नेते, प्रवक्ते, कार्यकर्ते त्यांचे आमदारांनी महापुरुषांबाबत बोलताना तारतम्य ठेवत, कायदा, संविधान काय सांगतो याकडे लक्ष दिले पाहिजे,"

अजित पवार म्हणाले...

आपण काय बोलतो सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते बोलूनच्या बोलून ते प्रवक्ते माझी काही चूक झालेली नाही, जो अर्थ काढला तोच चुकीचा काढला म्हणतात. यशवंत चव्हाण यांच्या सरकारपासून ते वेगवेगळ्या सरकारमध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी होत नव्हती. तशापद्धतीने महाराष्ट्राने ऐकलं नाही खपून सुद्धा घेतलं नाही. आता वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तींना पण यात तारतम्य राहिलं नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com