Rahul Gandhi on Stock Market Sarkarnama
देश

Rahul Gandhi on Stock Market : मोठी बातमी : मोदी-शाहांनी घडवला 'शेअर मार्केट स्कॅम'; राहुल गांधींचा पहिला वार

Rajanand More

Rahul Gandhi News : सत्तास्थापनेआधीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार प्रहार केला. शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याची थेट जेपीसीमार्फत चौकशी करण्याची मागणी राहुल यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत हा आरोप करताना क्रोनोलॉजी सांगितली. ते म्हणाले, 13 मेला अमित शाह यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. तर 19 मेला पंतप्रधान म्हणाले होते, चार जूनला शेअर मार्केट रेकॉर्ड ब्रेक करेल. मात्र, चार जूनला शेअर मार्केट कोसळले. सर्व रेकॉर्ड मोडले.

गुंतवणूकदारांचे तब्बल 30 लाख कोटींचे नुकसान झाले. यामध्ये पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे इतर नेते, तसेच एक्झिट पोल, परदेशी गुंतवणूकदार यांची चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधींचे आरोप...

पंतप्रधानांनी देशातील जनतेला गुंतवणुकीचा सल्ला का दिला, गृहमंत्र्यांनी शेअर खरेदी करण्याचे आदेश का दिले? दोघांनी दिलेल्या मुलाखती अदानींच्या वाहिन्यांना दिले होते. त्यांची सेबीकडून चौकशी सुरू आहे. यामध्ये चॅनेलचा काही रोल आहे का, परकीय गुंतवणुकदार आणि भाजपमध्ये काय नाते आहे, याची आम्हाला जेपीसीमार्फत चौकशी हवी आहे. देशाला याची माहिती हवी आहे, असे राहुल म्हणाले.

शेअर बाजारातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. जीपीसी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी सरकारवर दबाव आणू, असा इशारा देत राहुल यांनी सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT