PM Narendra Modi : पंडित नेहरुंची बरोबरी करणाऱ्या मोदींच्या नावावर नकोसा रेकाॅर्ड

PM Narendra Modi victory marg lowest : नरेंद्र मोदी हे आपल्या विरोधी उमेदवार अजय राय यांच्यावर 1 लाख 52 हजार मतांनी विजयी झाले.
jawaharlal nehru Narendra Modi
jawaharlal nehru Narendra Modijawaharlal nehru Narendra Modi
Published on
Updated on

Lok Sabha Election Result : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याच्या विक्रमाची नरेंद्र मोदींनी बरोबरी केली आहे. नेहरु सलग तीन वेळा 1952, 1957, 1962 पंतप्रधान जिंकत पंतप्रधान झाले होते. विद्यमान पंतप्रधान असताना विरोधी उमेदवाराच्या मतांमध्ये सर्वात कमी मतांच्या टक्केवारीने मोदी विजयी झाल्याच्या नकोसा रेकाॅर्ड मोदींच्या नावे झाला आहे.

विद्यमान पंतप्रधान निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या विरोधी उमेदवारापेक्षा जास्त अंतराने विजय होत असतो. मात्र, वारणसीमधून विजयी झालेल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या विरोधी उमेदवार अजय राय यांच्यावर 1 लाख 52 हजार मतांनी विजयी झाले. मात्र, हे अंतर 13.49 टक्के आहे. कोणत्याही विद्यमान पंतप्रधानाचे विजयाचे हे अंतर सर्वात कमी आहे.

विद्यमान पंतप्रधानांनी मिळवलेल्या लीडच्या टक्केवारीत हे मोदींचे विजयाची टक्केवारी सगळ्या कमी आहे. सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळण्याचे रेकाॅर्ड राजीव गांधी यांच्या नावावर आहे. त्यांनी 1984 मध्ये त्यांच्या विजयाचे अंतर हे 72.18 टक्के होते.

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 1957 मध्ये विजयाचे अंतर 21.88 टक्के, 1952 मध्ये हे अंतर 19.49 टक्के होते. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या विजयाचे अंतर 16.4 टक्के होते.

वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्रात सहा लाख 12 हजार 970 मतं म्हणजे 54.2 टक्के मतं मिळाली. अजय राय यांना चार लाख 60 हजार 457 म्हणजे 40.7 टक्के मतं मिळाली.

jawaharlal nehru Narendra Modi
Kangana Ranaut : CISF च्या महिला गार्डने कंगना रनौतच्या कानशिलात लगावली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com