Rahul Gandhi News : काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी बोस्टनमधील ब्राऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी भारतीय निवडणुकीमध्ये गडबड असल्याचे भाष्य केले. यासाठी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला.
राहुल गांधी म्हणाले, 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांने मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळपर्यंतची आकडेवारी दिली. पात्र साडेपाच ते साडेसात यावेळेत तब्बल 65 लाख मतदान झाल्याची आकडेवारी आली, असं होणं केवळ अशक्य आहे.'
'केवळ दोन तासांत 65 लाख मतदान हे अशक्यच आहे.कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी साधारण तीन मिनिटांचा वेळ लागतो. येवढे सगळ्यांनी मतदान केले असते तर पहाटे तीनपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली असती आणि मतदान करायला चार वाजले असते.', असे देखील राहुल गांधी यांनी म्हटले.
राहुल गांधी म्हणाले, पहाटेपर्यंत कुठेही मतदान झालेले पाहण्यास मिळाले नाही. आम्ही निवडणूक केंद्रावरील मतदानाचे व्हिडिओ देण्याची विनंती केली होती तसा अर्जही केला होता. मात्र व्हिडिओ आम्हाला देण्यात आले नाही. आता थेट कायदा करुन मतदान केंद्रावरील व्हिडिओ उपलब्ध करून दिले जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत, असा आरोपही राहुल यांनी केला.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला 132, शिवसेना 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला अवघ्या 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 20 जागा मिळाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.