Ahilyanagar Karjat Nagar Panchayat : नगराध्यक्षांना हटविण्याचा 'तो' अध्यादेश; शिंदे अन् पवारांच्या मतदारसंघात आज पहिला निर्णय होणार

Ahilyanagar Karjat Nagar Panchayat no-confidence motion Rohit Pawar group press conference targeting Bjp Ram Shinde : कर्जत नगरपंचायतीच्या अविश्वास ठरावावर आजच्या विशेष सभेपूर्वी नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.
Ahilyanagar Karjat Nagar Panchayat
Ahilyanagar Karjat Nagar PanchayatSarkarnama
Published on
Updated on

Karjat political news : महायुती सरकारनं नगराध्यक्षांना हटविण्याचा अधिकार नगरसेवकांना दिल्याचा नवीन अध्यादेशाला राज्यात पहिल्यांदा समोर जाणार आहे ती, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत! कट्टर विरोधक भाजपचे आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा राजकीय संघर्ष उफळला आहे.

आमदार पवार गटाचे नगराध्यक्षांविरोधात दाखल अविश्वास ठरावावर, आज सोमवारी विशेष सभा होणार आहे. या विशेष सभाच्या अदल्यारात्री कर्जतमध्ये अनेक वेगवान राजकीय घडमोडी घडल्या. त्यामुळे आज होणाऱ्या विशेष सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

आमदार रोहित पवारांनी विद्यमान नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भेट घेतली. तत्पूर्वी स्थानिक नेते तथा नगरसेवक नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर निशाणा साधला. प्रा. शिंदे यांचं कर्जत नगरपंचायतीबाबत विध्वंसक राजकारण केल्याचा घणाघात नामदेव राऊत यांनी केला. नगराध्यक्षा उषा राऊत, नगरसेविका प्रतिभा भैलुमे, राहुल नेटके, ज्ञानदेव लष्कर, नामदेव थोरात उपस्थित होते.

Ahilyanagar Karjat Nagar Panchayat
Neelam Gorhe : राज-उद्धव एकत्र येतील का? नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'वारसा तर शिंदेंकडे...'

कर्जत नगरपंचायतीचा नगराध्यक्ष बदलण्यासाठी अन् फक्त आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना राजकीय शह देण्यासाठी राज्याच्या सभापतीला कायदा बदलून अध्यादेश काढावा लागला, यातच आमचा मोठा विजय आहे. ओबीसी नेत्यांचं प्रस्थ कुठतरी खुपतं, त्यातूनच हा राजकीय डाव खेळला, असा टोला राऊतांनी सभापती प्रा. शिंदेंना लगावला.

Ahilyanagar Karjat Nagar Panchayat
Tahawwur Rana extradition : तहव्वुर राणा पूर्वी कोण-कोणत्या गुन्हेगारांना परदेशातून भारतात आणण्यात आलं

विकास कामांचे राजकारण खेळा, असे म्हणत उपनगराध्यक्षांनी यासाठी समोरा-समोर यावं, असं खुलं आव्हान घुले बंधूंना राऊतांनी दिलं. राजकारण होत असते, पण ज्यांच्या पडत्या काळात त्यांच्या विजयासाठी हातभार लावला, त्या नगरसेवकांनी साथ सोडली याचे दुःख निश्चित आहे, अशी खंत देखील राऊत यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्षा उषा राऊत यांनी आमदार रोहित पवारांनी विश्वास टाकत नगराध्यक्षा पदावर विराजमान केले होते. त्यास निश्चित न्याय दिला. मी कधीच खुर्चीसाठी काम केले नाही. जे कार्य केले ते लोकहित समोर ठेवूनच केले. या कठीण काळात ज्यांनी सहकार्य केले, त्यांचे आभार मानताना नगराध्यक्षा उषा राऊत भावूक झाल्या होत्या.

गटनेता कोण?

23 मार्चला अमृत काळदाते हेच आमच्या गटाचे गटनेते असून उपगटनेते नगरसेविका प्रतिभा भैलुमे आहेत. त्यामुळे संतोष मेहेत्रे यांना आम्हाला व्हीप बजाविण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पक्ष ठरवतो तोच गटनेता ठरतो. 26 मार्चला संतोष मेहेत्रे यांना गटनेत्या पदापासून मुक्त करण्यात आले. आमदार रोहित पवारांशी चर्चा केली असून, राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवायचा? की अविश्वास ठरावास सामोरे जायचे, याचा निर्णय झाला असून, तो आजच्या विशेष सभेलाच दिसेल, असे नामदेव राऊत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com