New Dehli news : संसदेत बोलू दिले गेले नसल्यामुळे संतप्त झालेल्या राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भाजप-आरएसएसवर हल्लाबोल केला. मला संसदेत बोलू दिले नाही. त्यामुळे मी कधीच भाजप, आरएसएसची माफी मागणार नाही, असे स्पष्ट करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचा इशारा लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सीजेपीच्या आंदोलनावेळी दिल्लीतील रस्त्यावर विध्यार्थ्यांना अमानुषपणे पोलिसांनी मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मारहाण करण्यासाठी लाकडी काठ्यांचा वापर केला. या काठ्यांना लोखंडी खिळे होते. त्यासोबतच मारहाण करण्यासाठी पॅलेट गनचा वापर करण्यात आला, अशी टीकाही यावेळी राहुल गांधी यांनी केली.
त्यासोबतच केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनामा घ्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. विद्यार्थ्यांवरील मारहाणीला अमित शहा हे जबाबदार आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय दिल्ली पोलीस पॅलेट गनचा वापर करू शकत नाहीत. त्यामुळे या सर्व मारहाणीला शहा हे जबाबदार असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, लोकसभेमध्ये आमचा आवाज दाबला जात आहे, मी लोकसभा अध्यक्षांना अनेकदा विनंती केली की मला बोलू द्या, पण मला बोलू दिले नाही. किरन रिजजू, राजनाथ सिंहजी आणि इतर सत्ताधारी पक्षातील नेते अनेकदा बोलले परंतु मला लोकसभेत बोलू दिले नाही, बोलण्याची संधी मिळाली नाही. मला म्हणाले माफी मागा, परंतु मी भाजप आणि संघाची कधीही माफी मागणार नाही, असा हल्लाबोलही यावेळी राहुल गांधी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा. त्यांना पदावरून तात्काळ हटवावे. पॅलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला, याची चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करावी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. अमित शहा हे नरेंद्र मोदी यांच्या सर्वात जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे आता सरकार राहुल गांधी यांच्या मागणीचा विचार करणार का? काँग्रेस नवे आंदोलन छेडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.