Sonam Wangchuk : आंदोलन, उपोषण कराल तर...: केंद्राने आणलेल्या कायद्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचे भाष्य

Nana Patole Statement : सोनम वांगचूक प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केला. आंदोलन आणि उपोषणांवर निर्बंध आणल्याचा दावा करत मोदी सरकारवर त्यांनी टीका केली.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 July : सोनम वांगचूक प्रकरणात हुकूमशाही सुरु झालेली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये उद्रेक व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला आता उपोषण, आंदोलन करता येणार नाहीत. तुम्ही आंदोलन, उपोषण कराल तर स्वतः ची आत्महत्या करण्याचा गुन्हा दाखल करून त्याद्वारे तुम्हाला जेलमध्ये टाकायचं, असा कायदा केंद्र सरकारने केलेला आहे, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

संतांच्या पालख्यांचे आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी नाना पटोले हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. महात्मा गांधींची तत्व केंद्र सरकारने आता संपावलेली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, संतांनी धर्माचे काम करायचं आणि राज्यकर्त्यांनी राज्याचे काम करायचं असत. पण अलीकडे अशोक खरातसारखे भोंदू महाराष्ट्रात जन्माला येऊन संत परंपरेला बदनाम करत आहेत. त्यामुळे भोंदूबाबांवर फार बोलावं, असं मला वाटत नाही.

केंद्र सरकारने सुरुवातीला तेथील कमिशनर बदलला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना चादरमध्ये बांधून हुकूमशाही पद्धतीने वांगचूक यांना हटविण्यात आले आहे. लोकशाहीची हत्या करण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, उच्च न्यायालयाचे निर्देश काय होते..? नीटमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना फाशीची सजा देण्याची गरज आहे. आता त्यात मार्कशीटचा घोटाळा झाला आहे. नीट परीक्षा घेण्यासाठी आता मिल्ट्री लावावी लागत आहे.

Nana Patole
Rahul Gandhi : सोनम वांगचुकांच्या विरोधात पोलिसांचा वापर, अखेर राहुल गांधींनी मौन सोडलं, मोदी सरकावर घणाघात; म्हणाले…

देशभरात आता मोठा उद्रेक सुरु झालेला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. राज्यस्थान, उत्तराखंडमध्ये राहुल गांधींना तरुणांचा जो पाठिंबा मिळाला आहे. संपूर्ण देशात अभिजीत दीपके, सोनम वांगचूक, राहुल गांधी यांच्या मागे देशातील तरुण एकवटल्याचे दिसून येते, असे नाना पटोले यांनी नमूद केले.

आमदार पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे विभाजन जेव्हा झालं, तेव्हा schedule 3 नुसार कारवाई केली असती तर आज हे धाडस झालं नसतं. पण त्याला विलंब करत नव्याने निवडणुका झाल्या. तो निर्णय राखून ठेवल्यामुळे केंद्रातील सरकारकडे पाशवी बहुमत असल्याने त्या आधारावर लोकशाहीचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला आहे, तो चुकीचा आहे. केंद्रात पाशवी बहुमताच्या आधारावर नियमात बसत नसताना सुद्धा शिवसेनेच्या 6 खासदारांना मान्यता मिळाली आहे.

चोर शिरजोर असं, चित्र देवेंद्र फडणवीस यांचं आपणाला पाहायला मिळत आहे. ज्या लोकांनी राम मंदिरात दान केलं आहे, ते सर्व बेईमान होते, त्यामुळे तिथं चोरी झाली, असं तिथल्या अध्यक्षांनी केलेले आहे. तिथल्या तिजोरीवर आरएसएसने डाका घातलेला आहे. त्याचं समर्थन देवेंद्र फडणवीस करणार आहेत का. त्याचं उत्तर फडणवीसांनी दिलं पाहिजे. पण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जनतेच्या श्रद्धेचा भाव त्यांनी ठेवला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परवा माझं जयंत पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं, ते म्हणालेत या अफवा आहेत, सध्या त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

हे सरकार शेतकरीविरोधी आहे. मुख्यमंत्री हे विद्युत पंपबिल माफ केली म्हणून घोषणा केली आणि टाळ्या वाजवून घेतल्या. एकीकडे एक रुपया लुटायचा आणि चार आणे द्यायचे, हे बेईमानच सरकार आहे. शेतकऱ्यांची चेष्टा करायचं काम सुरु असून भाजपही शेतकरीविरोधी पार्टी आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole
Jayant Patil : राष्ट्रवादीचे आमदार महायुती नेत्यांच्या संपर्कात का?; राजू खरेंचे नाव घेत जयंत पाटलांनी सांगितले कारण...

ते म्हणाले, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात उद्या निघणाऱ्या मोर्चात काँग्रेस सहभागी होणार आहे. अण्णा वयोवृद्ध आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार. मात्र, सध्या या भ्रष्टाचारी सरकारविरोधात अण्णा शांत बसले आहेत, त्यांना कधीकाळी देशाचे महात्मा गांधी, असं म्हटलं जायचं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com