The Supreme Court has sought the Election Commission’s response to allegations that CEC Gyanesh Kumar took certain decisions without the required consensus of the other Election Commissioners. Sarkarnama
देश

INDIA Alliance: मोठी बातमी: राहुल गांधी ज्ञानेश कुमारांना एक ना दोन तब्बल 48 प्रश्न विचारणार? इंडिया आघाडीचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

Congress Vs Election Commission: काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर आयोगाने दिलेले नाही, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: एकीकडे काँग्रेस प्रणित INDIA आघाडीकडून देशभरात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर तसेच मतचोरी,निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत रान पेटवलं आहे. याचदरम्यान, आता एक विरोधकांच्या गोटातून एक मोठी अपडेट समोर येत आहे.

आता सर्वोच्च न्यायालयाकडे एसआयआर प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत INDIA आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जाव्दारे केंद्रीय निवडणूक आयोगाला 48 प्रश्नांची प्रश्न विचारण्याबाबतची परवानगी मिळावी,अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार, अन्य दोन निवडणूक आयुक्त आणि आयोगाचे माहिती तंत्रज्ञान महासंचालक यांना प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तसेच या अर्जामधून निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर विरोधकांनी असमाधान व्यक्त केल्याचीही माहिती समोर येत आहे.

काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर आयोगाने दिलेले नाही, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

यावेळी 'वोट चोरी' आणि देशभरात राबवण्यात आलेल्या मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची आयोगाने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत, असा विरोधकांचा आक्षेप आहे.

काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 'वोट चोरी' संदर्भातील एकाही प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता INDIA आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त,अन्य दोन निवडणूक आयुक्त आणि माहिती तंत्रज्ञान महासंचालक यांना वैयक्तिकरित्या प्रश्न विचारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मागितली आहे. SIR प्रक्रियेतील कथित त्रुटींमुळे मतांची चोरी होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

प्रस्तावित 48 प्रश्नांच्या प्रश्नावलीत निवडणूक आयोगाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. यामध्ये देशभरात राबवण्यात आलेली SIR प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रियेतील बदलांचा समावेश आहे.

विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या किती निर्णयांना अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी विरोध केला होता? तसेच देशव्यापी SIR प्रक्रिया राबवण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला? असे प्रश्न या प्रश्नावलीत उपस्थित करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT