Delhi News : भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड रोखण्यासाठी जून 2023 मध्ये देशभरातली विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडीची स्थापना केली. या आघाडीत काँग्रेससह विविध राज्यातील भाजपविरोधी प्रमुख पक्षांचा सहभाग घेतला. महाराष्ट्रातील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेनेचा देखील या आघाडीत समावेश आहे.
मात्र, आता या इंडिया आघाडीचं नेतृत्व कोणी करायचं यावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपयशामुळे आता काँग्रेसकडील नेतृत्वाची धुरा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याकडे सोपवावी अशी मागणी केली जात आहे.
त्यामुळे देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत फूट पडणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर थेट ममतादीदींनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे आघाडीत फूट पडण्याची शक्यता बळावली आहे.
महत्वाचं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही काँग्रेसला (Congress) डावलून ममतादीदींच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवल्यामुळे काँग्रेसची आणि खासकरून राज्यातील महाविकास आघाडीची चांगलीच कोंडी झाली आहे.
तर ठाकरे गटाच्या या भूमिकेला राज्यातील काँग्रेस नेतृत्व कारणीभूत असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, इंडिया आघाडीत प्रमुख पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसनं (TMC) आघाडीच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करत आघाडीचं नेतृत्त्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचं नेतृत्त्व करण्याऱ्यांवर ती नीट चालवण्याची जबाबदारी आहे.
मात्र, ते नीट चालवत नसतील आणि मला संधी दिली तर मी आघाडी व्यवस्थित कशी काम करेल याकडे लक्ष देईन असं ममतादीदींनी म्हटलं आहे. शिवाय बंगालबाहेर जाण्याची आपली इच्छा नाही, पण बंगालमधूनच आघाडीचं नेतृत्त्व करु शकते असं त्यांनी म्हटलं आहे. असं म्हणत ममतादीदींनी थेट इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वावरुन राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधल्याचं स्पष्ट झालं आहे.
त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निकालानंतर इंडिया आघाडीतील मतभेद समोर येऊ लागले आहेत. तर सोमवारी झालेल्या संसदेबाहेरील अदानींविरोधातील आंदोलनापासून देखील टीएमसी, समाजवादी पार्टी आणि आप दूर राहिल्याचं पाहायला मिळालं.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर या आघाडीतून नितीशकुमार बाहेर पडले आणि लोकसभेला इंडिया आघाडीत असूनही आपने पंजाब आणि ममतादीदींनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला डावलून एकला चलोची भूमिका घेतली. त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर विश्वास उरला नाही का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.