
Solapur News : विधानसभा निवडणुकीनंतर एकीकडे महायुती सरकारनं दमदार सत्ता काबीज केली आहे. तर दुसरीकडे दाणादाण उडालेल्या विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला मात्र एकावर एक हादरे बसू लागले आहेत.
विरोधी पक्षनेतेपदापर्यंतही न पोहचू शकलेल्या विरोधकांसाठी पुढील पाच वर्षांची वाटचाल ही निश्चितच खडतर असणार आहे. यातच सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंगळवारी (ता.10) सोलापूर दौऱ्यावर आले होते.त्यांनी ईव्हीएमविरोधात जंग छेडलेल्या मारकडवाडी गावाला भेट दिली. त्याचदिवशी जिल्ह्यात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला. धवलसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा देताना 'लेटर बॉम्ब' टाकला आहे. त्यांनी राजीनामा देताना डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे. सोलापूर काँग्रेस ही शिंदे काँग्रेस झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे मोठे झाले आहे. सोलापूरची काँग्रेस ही शिंदे काँग्रेस झाली असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली असून यामागे विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून तिकीट वाटप केल्याचा हा फटका असल्याचंही विधानही केलं आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे.
धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले,सुशीलकुमार शिंदे यांना दहा वर्षे लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्याचठिकाणी प्रणिती शिंदे यांना खासदार म्हणून निवडून आणलं. त्या आमदार असलेल्या मतदारसंघात त्यांना अवघं 779 लीड मिळालं. मात्र,पंढरपूर,मंगळवेढा,मोहोळ,दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये जवळपास 66 हजारांचं मताधिक्य मिळवून देत त्यांना विजयी केलं.
पण विधानसभेला कोणालाही विश्वासात न घेता उमेदवार दिल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही,असा दावाही मोहिते पाटलांनी यावेळी केला.शिंदे कुटुंबियांकडून पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे. यामुळे सोलापुर काँग्रेसमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.