Nirmala Sitharaman Sarkarnama
देश

Tata Sons row : राहुल गांधींनी मोदी-शाहांना घेरले, निर्मला सीतारमण यांनी थेट काँग्रेसचा इतिहास काढला! टाटा वादात नवा ट्विस्ट

Rahul Gandhi targets Modi and Shah over Tata Sons row Nirmala Sitharaman hits back with Congress licence-quota raj record : टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या फेरनियुक्तीवरून वाद; मोदी-शाह यांच्यावर राहुल गांधींचा निशाणा, तर काँग्रेसच्या ‘लायसन्स-कोटा राज’चा दाखला देत सीतारमण यांचा पलटवार.

Pradeep Pendhare

Rahul Gandhi Vs Nirmala Sitharaman : टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या फेरनियुक्तीवरून सुरू असलेल्या वादात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुनावले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावरून राहुल गांधींना प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देणे टाळावे, असा सल्ला देताच, उद्योगजगतामध्ये अविश्वास आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करून, व्यावसायिक नेत्यांना तुमच्यासोबत येण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहात का? असा प्रश्न केला.

टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या फेरनियुक्ती प्रक्रियेवरून टाटा समूहातही मतभेद समोर आले आहेत. या वादात विरोधी पक्षनेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी, टाटा समूहाला जाणीवपूर्वक गुन्हेगारी पद्धतीने उद्ध्वस्त केले जात असल्याचा आरोप करत, भारतीय उद्योगजगत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातातील खेळणे नाही, म्हणत निशाणा साधला. तसेच, सरकारच्या कथित दबावाविरोधात उद्योगजगतातील बडे व्यावसायिक आवाज उठवत नाहीत. पण या गुन्ह्यांबद्दल न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असा इशारा दिला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी, (BJP) भाजपच्यावतीने राहुल गांधींवर जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देणे टाळावे, असा सल्ला देत, व्यावसायिक आणि कायदेशीरबाबींना गुन्हेगारी स्वरूप देणे अस्वीकारार्ह आहे. भारतीय उद्योगजगतावर आणि त्यांच्या यशावर वारंवार टीका केली आहे. आता तुम्ही उद्योगजगतामध्ये अविश्वास आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहात. व्यावसायिक नेत्यांना तुमच्यासोबत येण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहात का? असा सवाल केला.

निर्मला सीतारमण यांनी, काँग्रेसने दशकानुदशके जाचक ‘लायसन्स-कोटा राज’च्या माध्यमातून भारतीय उद्योजकांच्या उत्साहाला लगाम घातला आणि कोट्यवधी भारतीयांना गरिबीत ढकलले, असा गंभीर आरोप केला. संकुचित राजकीय स्वार्थासाठी निराधार आरोप करण्याऐवजी रचनात्मक संवादावर भर देण्याचाही सल्ला सीतारमण यांनी दिला.

भारतीय संविधानाचा दाखल देताना, सर्व नागरिकांना न्यायाची हमी आहे. त्याचे रक्षणाची जबाबदारी न्यायालयांवर सोपवण्यात आली आहे. मात्र, तुम्ही, तुमचा पक्ष आणि तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारांमधील पंतप्रधानांनी न्यायव्यवस्थेला ज्या प्रकारे दुय्यम वागणूक दिली, त्याचा साक्षीदार इतिहास आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी विनाकारण संशय घेणे आणि नसलेले संकट शोधणे थांबवा, असा टोला सीतारमण यांनी राहुल गांधी यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT