Rahul Gandhi Protest | Dharmendra Pradhan | NEET Row Sarkarnama
देश

Rahul Gandhi : धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाहीच, सरकारचा वेगळाच प्लॅन; राहुल गांधींचा मोठा दावा

Rahul Gandhi Dharmendra Pradhan : विद्यार्थ्यांना ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,तसेच सरकारने विद्यार्थ्याची माफी मागावी आणि धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या तीन मागण्यांचा पुनर्रउच्चर राहुल गांधी यांनी केला.

Roshan More

Rahul Gandhi News : जंतर मंतरसह देशभर शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासाठी आंदोलन होत आहे. आज दुपापर्यंत धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात असताना राहुल गांधी मोठा दावा केला आहे.

सरकार धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदलण्याचा प्लॅन करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. आम्हाला प्रधान यांचा राजीनामा हवा आहे, खाते बदल नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,तसेच सरकारने विद्यार्थ्याची माफी मागावी आणि धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या तीन मागण्यांचा पुनर्रउच्चर राहुल गांधी यांनी केला.

आंदोलन सहभागी होत उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यासोबत राहुल गांधी यांनी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, मी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. पेपर लीकसह शिक्षण व्यवस्था कशी हायजॅक करण्यात आली याबाबत आम्ही बोललो.

धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई, पुणे येथे शुक्रवारी मोठे आंदोलन झाले. जंतर मंतरपेक्षा देखील हे मोठे आंदोलन होते, असे अभिजीत दीपके यांनी सांगितले.

पुन्हा मोर्चा निघणार...

पोलिसांनी केलेल्या मारहाणीविषयी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, विद्यार्थ्यांना एवढे घाबरू नका की ते घाबरणेच सोडून देतील. दिल्ली पोलिसांनी त्यांची वर्दी काढावी आणि आरएसएसचा गणवेश घालावा. तसेच धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पुन्हा मोर्चा काढू, असा इशारा देखील त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT