Abhijit Dipke : पेपर फुटीप्रकरणी काँक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचे पहिल्यादांच घरच्या अंगणात आंदोलन!

NEET Paper Leak Protest News : युपीएससी, एमपीएससी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरण आणि सातत्याने पेपर फुटीचे घडणारे प्रकार यामुळे संताप व्यक्त केला आहे.
Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Abhijeet Dipke rejects Sanjay Raut's claim of a secret Narendra Modi meeting in the US, calling the alleged photo AI-generated.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : नीट, टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणानंतर राज्यातील विद्यार्थी व त्यांच्या संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. पेपर लीक, परीक्षा घोटाळे आणि शिक्षण व्यवस्थेतील गडबडींविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या वतीने दिल्लीतील जंतरमंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दीपके देशभरात करत आहेत. आज छत्रपती संभाजीनगर जिथे दिपके यांचे स्वतःचे घर आहे. त्या शहरात त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्याचे मोठे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.

NEET, CUET, CBSE आणि SSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये कथित पेपर लीक आणि अनियमितता झाल्याच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. युपीएससी, एमपीएससी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरण आणि सातत्याने पेपर फुटीचे घडणारे प्रकार यामुळे संताप व्यक्त केला आहे. आतापर्यंत देशभरात वीसहून अधिक विद्यार्थ्यांनी पेपरफुटीला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला आहे.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Abhijeet Dipke: पुणे विद्यापीठात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला तरुणांचा तुफान प्रतिसाद; अभिजीत दिपकेनं केलं महत्वाचं आवाहन

या सगळ्या प्रकाराला आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान (Dharmendra Pradhan) हे जबाबदार आहेत. परंतु केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत. आम्ही दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करतो आहोत, देशभरात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परंतु सरकार प्रधान यांना पाठीशी घालत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सरकार दखल घेत नाही, विद्यार्थ्यांचे ऐकत नाही, तर मग पंतप्रधान मोदी कोणाचं ऐकतात? डोनाल्ड ट्रम्पचे का? असा सवाल दीपके यांनी केला.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Abhijeet Dipke: "पोलीस येताहेत..." अभिजीत दिपकेंना अटक होणार? स्वतः व्हिडिओद्वारे दिली माहिती; तरुणांना केलं महत्वाचं आवाहन

डोनाल्ड ट्रम्प सांगतात रशियाकडून तेल खरेदी करू नका, लगेच पंतप्रधान त्यांचे ऐकतात, ट्रम्प सांगतात अमेरिकेतील वस्तूवरील टेरिफ कमी करा, मोदी लगेच ऐकतात, देशातील जनतेचा, विद्यार्थ्यांचे ते का ऐकत नाहीत? मोदी यांना सत्तेवर देशातील जनेतेने बसवले आहे की ट्रम्प यांनी? असा टोलाही दीपके यांनी लगावला.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Abhijeet Dipke Assaulted : CJPच्या अभिजीत दिपकेंना मारहाण! आंदोलनादरम्यान भाषण करत असताना झाला हल्ला

स्पर्धा परीक्षांमध्ये निष्पक्षता आणि विश्वासार्हता - पेपर लीक प्रकरणांवर कठोर कारवाई आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया, शिक्षणाचे डिजिटायझेशन योग्य प्रशिक्षणानंतरच ते केले जावे, घाईघाईने डिजिटलायजेशन करणे थांबवावे, परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी करावा, शिक्षण व्यवस्थेतील अपयशासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्या आंदोलकांकडून केल्या जात आहेत. परीक्षा ऑफलाइन घ्याव्यात आणि पेपरफुटी थांबवावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Abhijeet Dipke: "पोलीस येताहेत..." अभिजीत दिपकेंना अटक होणार? स्वतः व्हिडिओद्वारे दिली माहिती; तरुणांना केलं महत्वाचं आवाहन

सीईटीसह विविध परीक्षांचे पेपर फुटल्याच्या घटनांबाबत सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे. पेपरफुटी रोखणे, पारदर्शक भरती प्रक्रिया राबविणे, रखडलेल्या नोकरभरती तातडीने पूर्ण करणे आदी मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Rahul Gandhi: 'कॉक्रोच' आंदोलनानंतर काँग्रेसला आली जाग! राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार विरोधात मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com