rahul gandhi.jpg sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधी 'चक्रव्यूहा'त? मध्यरात्री 1 वाजून 52 मिनिटांनी 'ईडी'बाबत खळबळजनक दावा

Rahul Gandhi Claims Ed Raids : राहुल गांधी संसदेत 'चक्रव्यूह'चे उदाहरण देत मोदी सरकारवर तुटून पडले होते. यानंतर 'ईडी' अ‍ॅक्शन मोडवर आल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.

Akshay Sabale

महाभारतात रचलेल्या 'चक्रव्यूहा'ची तुलना करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी ( 29 जुलै ) मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. या भाषणानंतर सक्तवसुली संचालनालय ( ईडी ) आपल्यावर धाड टाकण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

'ईडी'तील काहीजणांनी ही माहिती आपल्याला दिल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधींच्या दाव्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी मध्यरात्री 1 वाजून 52 मिनिटांनी 'एक्स' अकाउंटवर ट्विट केलं आहे. त्यात मी 'ईडी'ची वाट पाहतो आहे. त्यांना माझ्याकडून चहा, बिस्कीट मिळेल, असं म्हणत राहुल गांधींनी 'ईडी'ला आव्हान दिलं आहे.

ट्विटमध्ये काय?

"टू इन वनला माझे 'चक्रव्यूह' भाषण आवडलं नाही, हे जाहीर आहे. 'ईडी'तील काही लोकांनी मला सांगितलं की, छापे टाकण्याची योजना बनविण्यात येत आहे. शर्टाच्या बाह्या मागे सारून मी 'ईडी'ची वाट पाहत आहे. त्यांना माझ्याकडून चहा आणि बिस्कीट मिळेल," असं म्हणत राहुल गांधींनी 'ईडी'सह मोदी सरकारला ललकारलं आहे.

राहुल गांधींनी संसदेत काय म्हटलं होतं?

महाभारतात रचलेल्या 'चक्रव्यूहा'ची तुलना करत राहुल गांधींनी सोमवारी मोदी सरकारलं घेरलं होतं. भाजपचा हा 'चक्रव्यूह' 'इंडिया' आघाडी भेदून काढेल. त्यासाठी हमीभाव आणि जातनिहाय जनगणना करणे हाच पर्याय आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात गांधी यांनी शेतकरी, युवा, महिला, कामगार, लघु-उद्याोजक, दलित-आदिवासी, ओबीसींची तुलना अभिमन्यूशी केली. सहा जणांनी अभिमन्यूची हत्या केली. आताच्या आधुनिक 'चक्रव्यूहा'त आधुनिक अभिमन्यूंना अडकवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उद्याोगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या सहा जणांनी हा आधुनिक 'चक्रव्यूह' रचल्याचा आरोप राहुल गांधींनी यांनी केला. या लोकसभेतच ‘इंडिया’ आघाडी हमीभावाचा कायदा आणि जातगणना संमत करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मध्यमवर्गही भाजपपासून दूर जात असल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT