Chetan Bhagat On Rahul Gandhi : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असा दावा प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी केला आहे. राहुल गांधींमध्ये दिवसेंदिवस होणारा बदल, त्यांचं लोकांमध्ये मिसळणं आणि भारत जोडो यात्रा, यामुळे त्यांच्याबाबतचं जनमत बदललं असल्याचंही चेतन भगत यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून राहुल गांधींमध्ये अनेक बदल घडून आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी दमदार कामगिरी करुन दाखवली. त्यामुळेच त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांचा विश्वास वाढला आहे. भाजपविरोधात आक्रमक होण्याची झलक राहुल गांधींच्या संसदेतील भाषणामधून दिसून येते.
एका वृत्तानुसार, भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेमुळे राहुल गांधींची (Rahul Gandhi) प्रतिमा सुधारल्याचं अनेकांचं मत आहे. त्यामुळे लोक आता त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणू लागले आहेत. या सगळ्या चर्चा सुरु असतानाच आता प्रसिद्ध लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) यांच्या वक्तव्याने काँग्रेसजन सुखावले आहेत. शिवाय भगत यांचे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चेतन भगत म्हणाले, राहुल गांधींनी योग्य निर्णय घेतल्यास ते लवकरच देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. आता राहुल गांधींची प्रतिमा सुधारली आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदललं आहे. धर्मासारखे अवघड मुद्देही ते चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि मांडतात. शिवाय ते भाजपला (BJP) भिडतात. मात्र, स्वत:ला बदलण्यासाठी त्यांनी बराच काळापासून प्रयत्न सुरु केले आहेत.
पेपरफुटी असो वा अग्निवीर योजनेचा मुद्दा असो ते योग्यरित्या मांडतात. जे लोकांना ऐकावंस वाटतं. नाहीतर याआधी लोकांना गांधी घराण्याचे ऐकायलाही नको वाटत होतं. राहुल गांधी सध्या योग्य ठिकाणी आहेत आणि राजकारण योग्य वेळेला खूप महत्व असतं.
तर राहुल गांधीचं व्यक्तीमत्व बदलण्यासाठी त्यांना भाजपनेच मदत केल्याचा दावाही भगत यांनी केला. ते म्हणाले, "अनेकांनी त्यांना पप्पू घोषित केलं होतं, लोकही त्यांना त्या दृष्टीने पाहत होते. पण त्यांनी या गोष्टींशी संघर्ष केला आणि स्वत:मध्ये बदल घडवून आणला. राहुल गांधी सध्या वेगळ्या मूडमध्ये असून ते काम देखील करत आहेत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.