Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : संविधान अन् मनुस्मृतीची प्रत दाखवत राहुल गांधींची भाजपवर टीका; म्हणाले, ' सरकारने युवकांचे अंगठे कापले...'

Political News : मनुस्मृतीवर देश चालणार नाही. हजार वर्षांपूर्वी एकलव्याचा अंगठा ज्या प्रकारे कापला गेला होता. त्याचप्रमाणे आज देशातील केंद्र सरकार तरुण आणि गरिबांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Sachin Waghmare

New Dehlli News : लोकसभेत संविधानावरील चर्चेचा शनिवारी दुसरा दिवस आहे. संसदेत संविधानावर चर्चा सुरु आहे. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी संविधान आणि मनुस्मृतीची प्रत दाखवत टीका केली. मनुस्मृतीवर देश चालणार नाही. हजार वर्षांपूर्वी एकलव्याचा अंगठा ज्या प्रकारे कापला गेला होता. त्याचप्रमाणे आज देशातील केंद्र सरकार तरुण आणि गरिबांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Rahul Gandhi News)

आपले संविधान विचारांचा एक समूह आहे. संविधान एक जीवन दर्शन आहे. संविधान आमचा एका सांस्कृतिक विचार आहे. संविधानात प्राचीन वारसा सामावलेला असल्याचे सांगत संविधानात आम्हाला बाबासाहेबांचे आदर्श दिसतात, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपला देशाची ताकद हिसकावायची आहे. शेतकऱ्यांऐवजी अंबानी, अदानी यांना फायदा पोहोचवला जात आहे. पेपरलीक सारख्या प्रकरणात युवकांचा अंगठा कापला जातोय, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली.

कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधींनी यावेळी भाषणात द्रोणाचार्य आणि एकलव्यचा उल्लेख केला. “जसा द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला, तसे तुम्ही हिंदुस्तानच्या युवकांचा अंगठा कापत आहात. देशातील सर्व उद्योग अदानीला दिले जात आहेत. देशातील उद्योगपतींचा अंगठा कापला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

आरएसएसने मनुस्मृतीला संविधानापेक्षा चांगले ठरवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. सावरकरांनी सुद्धा संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचे स्थान दिले होते. मात्र, संविधानात आम्हाला बाबासाहेबांचे आदर्श दिसतात, असेही यावेळी राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

आमची विचारधारा, इंडिया आघाडीच्या विचारधारेने देशात संविधान आणले आहे. आपण सर्व मिळून संविधानाचे रक्षण करू. आज राजकीय समता संपल्याचे सर्वांना स्पष्ट झाले आहे. सर्व संस्था ताब्यात घेतल्या आहेत. सामाजिक-आर्थिक समानता नाही. कोणत्या लोकांचे अंगठे कापले गेले आणि कुठे हे आम्हाला दाखवायचे असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT