Rahul Gandhi, Amit shah Sarkarnama
देश

Rahul Gandhi : अमित शाह यांच्यावरील टिप्पणी राहुल गांधींना भोवणार; कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Rahul Gandhi Amit Shah Defamation case : राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना अमित शाह हे खुनी असल्याचा आरोप केला होता. त्या संदर्भात राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्याने केली होती.

Roshan More

Rahul Gandhi News : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष, सध्याचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीमुळे त्यांना शुक्रवारी (ता.26) सुलतानपूर येथील न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू असल्याने न्यायालयाच्या निकालाकडे काँग्रेस नेत्यांचे लक्ष लागले आहे.

2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह हे खुनी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याविरोधात सुलनातपुरमधील भाजपच्या नेत्याने राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

प्रचार दौऱ्याच्या नंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना अमित शाह हे खुनी असल्याचा आरोप केला होता. त्या संदर्भातील व्हिडिओ क्लीप याचिका करणाऱ्या भाजप नेत्याने न्यायालयात सादर करत राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. भाजप नेत्याचा दावा मान्य करत सुलतानपूर न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात दावा चालण्यास परवानगी दिली होती.

भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान 20 फेब्रुवारीला राहुल गांधी हे न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. मात्र, या प्रकरणाची अंतिम सुनावणी दोन जुलै होती. संसदेच्या कामकाजामुळे राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहता येत नसल्याचे राहुल गांधी यांच्या वकीलाने न्यायालयाला सांगितले होते.

न्यायालयाने या प्रकरणात राहुल यांच्या वकीलाचे म्हणणे मान्य करत 26 जुलैला अंतिम सुनावणीसाठी राहुल गांधी यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

कोर्टाच्या निकालाकडे लक्ष

राहुल गांधी यांच्यावर मानहानी केल्याचा दावा असल्याने न्यायालय काय निकाल देणार याकडे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांना वरच्या न्यायालयात अपील करता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT