Om Birla : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला महुआ मोइत्रांवर भडकले, 'तुम्ही मला...'

Om Birla Mahua Moitra Abhishek Banerjee mamata Banerjee : लोकसभेचा सदस्य नसलेल्या व्यक्तीचे नाव घेऊ नका, असा आदेश ओम बिर्ला यांनी भाजप सदस्याला दिले. मात्र, भाजप खासदाराच्या निलंबणासाठी मोइत्रा आणि अभिषेक बॅनर्जी आक्रमक झाले.
Om Birla Mahua Moitra
Om Birla Mahua Moitra sarkarnama
Published on
Updated on

Om Birla News : लोकसभेच्या अधिवेशनात भाजपच्या खासदाराने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उल्लेख केला. त्यामुळे भडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

भाजप खासदाराचे निलंबन करा, अशी मागणी खासदार महुआ मोइत्रा आणि तृणमुलच्या सदस्यांनी लावून धरली. भाजप खासदाराच्या निलंबनाची मागणी मोइत्रा यांनी केली असता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भडकले. 'तुम्ही मला मार्गदर्शन करणार का?' असा संतप्त सवाल ओम बिर्ला यांनी केली.

लोकसभेचा सदस्य नसलेल्या व्यक्तीचे नाव घेऊ नका, असा आदेश ओम बिर्ला यांनी भाजप सदस्याला दिले. मात्र, भाजप खासदाराच्या निलंबणासाठी मोइत्रा आणि अभिषेक बॅनर्जी आक्रमक झाले. त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे बिर्ला यांचा पार चढला.

'तुम्ही मला मार्गदर्शन करणार का? नो नो..मै ये अलाऊ नही कर सकता. तुम्हाला बोलायचे असेल तर बोल नाहीतर राहुद्या.', असा शब्दांत मोइत्रा यांना लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी सुनावले.

Om Birla Mahua Moitra
Jagan Mohan Reddy : जगन मोहन रेड्डींच्या आंदोलनाचा फायदा इंडिया आघाडीला होणार? 'YSRCP' आघाडीसोबत येण्यासाठी विरोधकांची फिल्डिंग

अभिषेक बॅनर्जी यांनी देखील भाजप सदस्याला निलंबित करण्याचा मुद्दा लावून धरला. जी व्यक्ती संसदेची सदस्य नाही त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत भाजप खासदाराच्या निलंबनाची मागणी केली.

विरोधी पक्षांचा हल्लाबोल

अर्थसंकल्पावर बुधवारपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा होणार होती. त्याआधीच विरोधकांनी सरकारला हल्लाबोल केला आहे. अर्थसंकल्पाविरोधात इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी संसदेबाहेर बुधवारी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी नेते सहभागी झाले होते.

Om Birla Mahua Moitra
IAS Smita Sabharwal : पूजा खेडकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली अन् वादात अडकल्या; स्मिता सभरवाल का आहेत चर्चेत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com