Rahul Gandhi Disqualified as MP News update sarkarnama
देश

Rahul Gandhi यांची खासदारकी रद्द झाली ; याआधी लालू प्रसाद यादव, जयललितांसह भाजप नेत्यांवर आली होती ही वेळ

Rahul Gandhi Disqualified as MP : एका खूनप्रकरणी राष्ट्रवादीचे फैजल यांना दोषी ठरवले होते.

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi Disqualified as MP : 'मोदी'आडनावावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमवावी लागली आहे. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना काल (गुरुवारी) दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. २०२४ ची निवडणूक ते लढवू शकणार नाही. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे. राहुल गांधी यांच्यापूर्वीही काही लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारची कारवाई केली आहे. याबाबत जाणून घेऊया

लालू प्रसाद यादव : माजी केंद्रीय मंत्री, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना ३ आँक्टोबर २०१३ मध्ये चारा गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

जयललिता :तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची अशाच प्रकरणात दोन वेळा आमदारकी रद्द करण्यात आली होती. २००२ मध्ये भष्ट्राचार प्रकरणी, २०१४ मध्ये आयकर विभागाच्या केलेल्या कारवाईमुळे त्यांना दोषी ठरविण्यात आले होते.

मोहम्मद फैजल : गेल्या 13 जानेवारी रोजी लक्षव्दीप सत्र न्यायालयाने एका खूनप्रकरणी राष्ट्रवादीचे फैजल यांना दोषी ठरवले होते. त्यांच्यावर लोकसभा सचिवालयाने कारवाई करुन खासदारकी रद्द केली होती. त्यांना पोटनिवडणुक लढविण्यास मनाई केली होती.

आजन खान :समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आजम खान यांना वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती.

विक्रम सैन : भाजपचे आमदास सैन यांना २०१३ मध्ये मुजफ्फरपूर दंगल प्रकरणात दोन वर्ष शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची आमदारकी एक महिन्यातच रद्द करण्यात आली होती.

कुलदीप सिंह सैंगर : उन्नाव विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार सैंगर यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल होऊन शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आमदारकी गमवावी लागली होती.

याबरोबर आमदार अशोक कुमार सिंह चंदेल, राज्यमंत्री रशीद मसूद, भाजपचे आमदार बजरंग सिंह, भाजपचे आमदार खब्बू तिवारी, बिहारमधील जगदीप शर्मा, अनिल कुमार साहनी आदी लोकप्रतिनिधी दोषी आढळल्याने त्यांच्यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT