Rahul Gandhi FIR | SC-ST Act Case | Haldwani Sarkarnama
देश

Rahul Gandhi FIR : मल्लिकार्जुन खर्गेंसाठी भांडताना राहुल गांधी स्वत:च अडचणीत; भाजपशासित राज्यात अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Rahul Gandhi Haldwani case : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीनंतर काही दिवसांनी हलद्वानी येथील रामलीला मैदानात शुद्धीकरण हवन आयोजित करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी या कृत्याला गुन्हा संबोधत, हे कृत्य संपूर्ण भारतात दलितांना सामोरे जाव्या लागणाऱ्या अस्पृश्यतेचं उदाहरण असल्याचं म्हटलं होतं.

Jagdish Patil

Uttarakhand News, 31 Aug : उत्तराखंड मधील हलद्वानीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधातच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी हलद्वानी येथील रामलीला मैदानातील शुद्धीकरण हवनला दलित विरोधी म्हटलं होतं. यावरूनच अनुसूचित वर्गाच्या भावना दुखावल्याचा गंभीर आरोप करत अमित कुमार नावाच्या तरूणाने राहुल गांधींविरोधात तक्रार केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीनंतर काही दिवसांनी हलद्वानी येथील रामलीला मैदानात शुद्धीकरण हवन आयोजित करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी या कृत्याला गुन्हा संबोधत, हे कृत्य संपूर्ण भारतात दलितांना सामोरे जाव्या लागणाऱ्या अस्पृश्यतेचं उदाहरण असल्याचं म्हटलं होतं. शिवाय या प्रकरणावरून त्यांनी भाजपा-आरएसएसची मानसिकता उघड होते असंही म्हटलं होतं.

यावेळी त्यांनी या विधीसाठी जबाबदार असलेल्यांवर एसी-एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील केली होती. मात्र, आता राहुल गांधी यांच्या विरोधातच हलद्वानी येथील रहिवासी अमित कुमार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित कुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की, ते वाल्मिकी समाजाचे सदस्य असून त्यांनी इतर अनुसूचित जातीच्या सदस्यांसह ११ ऑगस्ट रोजी हलद्वानी येथील रामलीला मैदानात आयोजित स्वच्छता मोहीम आणि धार्मिक विधीमध्ये भाग घेतला होता. रामलीला मैदानातील कृत्याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा जातीशी संबंध नव्हता, असं असूनही, राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत, कोणतीही शहानिशा न करता, याला अस्पृश्यता आणि अनुसूचित जातींविरुद्धचा गुन्हा म्हटलं आणि या विधीमध्ये सहभागी झालेल्यांवर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली, असा दावा कुमार यांनी केला आहे.

तसंच आपण स्वतः वाल्मिकी समाजाचे असूनही, त्यांची प्रतिमा अस्पृश्यता पाळणारे आणि दलित विरोधी अशी तयार करण्यात आली आहे. गांधी यांच्या आरोपांमुळे विविध समाजांमध्ये शत्रुत्व आणि तणाव वाढल्याचा दावाही कुमार यांनी केला. त्यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT