Manoj Jarange protest : जरांगे पाटलांच्या आंदोलनात आता अभिजीत दिपकेंची एन्ट्री; थेट अंतरवाली सराटीत जाण्याची केली घोषणा

Abhijeet Dipke Supports Manoj Jarange : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलन करणे हा कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाचा पहिला पर्याय नसतो,सरकारसमोर आपल्या मागण्या मांडल्यानंतर सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल, तर शेवटी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, असं म्हटलं आहे.
Abhijeet Dipke announces support for Manoj Jarange Patil’s Maratha reservation protest and says he will meet him at the protest site.
SarkarnamaAbhijeet Dipke announces support for Manoj Jarange Patil’s Maratha reservation protest and says he will meet him at the protest site.
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण आंदोलनस्थळी जाणार असून, त्यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे दिपके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य करत असताना पत्रकारांनी त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला. त्यावर दिपके यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची भूमिका समजून घेत त्याला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची वेळ का आली, याचा विचार करण्याची गरज असल्याचे दिपके म्हणाले.

त्यांच्या मते, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सरकारबाबत एक प्रकारची नाराजी आणि अस्वस्थता निर्माण होत आहे. विशेषतः मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांना भविष्यात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा पालक आणि तरुणांची आहे. मात्र, या अपेक्षा पूर्ण होत नसल्याची भावना समाजात निर्माण होत असल्याने सरकारवरील विश्वास कमी होत असल्याचे दीपके यांनी नमूद केले.

Abhijeet Dipke announces support for Manoj Jarange Patil’s Maratha reservation protest and says he will meet him at the protest site.
AAP leader murder : भर बाजारात AAP नेत्याची गोळ्या झाडून हत्या; नगरपंचायत निवडणुकीच्या वादातून हल्ला?

'आंदोलन हा शेवटचा पर्याय'

दिपके म्हणाले की, "आंदोलन करायला कोणालाही आवडत नाही. आंदोलन हा नेहमीच शेवटचा पर्याय असतो. जेव्हा तुम्ही चर्चा करता, विनंत्या करता; पण तरीही सरकार ऐकत नसेल, तर शेवटी आंदोलनाचा पर्याय असतो.

Abhijeet Dipke announces support for Manoj Jarange Patil’s Maratha reservation protest and says he will meet him at the protest site.
IAS officer arrested : KPSC भरतीतील कथित गैरप्रकार; IAS अधिकारी ज्ञानेंद्र गंगवार यांना CIDकडून अटक

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजातील मुलांच्या दर्जेदार शिक्षणाची मागणी आहेत. आजच्या घडीला हाच सर्वात मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मनोज जरांगे पाटील यांची मी तेथे जाऊन भेट घेणार आहे. कारण ते आम्हाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला आले होते, आता त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचंही कर्तव्य आहे," असं म्हणत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com