Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : राहुल गांधींना 'त्या' प्रकरणात झारखंडमधील न्यायालयाने बजावले समन्स!

Jharkhand MP MLA Court : राहुल गांधींना 11 जून रोजी कोर्टासमोर हजर होण्यास सांगितले गेले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Congress Vs BJP News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढवणारी एक बाब समोर आली आहे. झारखंडमधील एमपी-एमएलए कोर्टाने मंगळवारी राहुल गांधी यांच्याविरोधात समन्स जारी केलं आहे. कोर्टाने भाजपकडून दाखल करण्यात आलेल्या मानहानी प्रकरणात राहुल गांधींना 11 जून रोजी कोर्टासमोर हजर व्हावे लागणार आहे.

भाजपचे युवा नेते नवीन झा यांनी मानहानी प्रकरणी याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचे वकील विनोद साहू यांनी म्हटले की, अजामीनपत्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती. ज्यानंतर कोर्टाकडून समन्स जारी केले गेले. वकील विनोद साहू यांनी म्हटले की, सार्थक शर्मा यांच्या एमपी-एमएलए स्पेशल कोर्टाने राहुल गांधींना(Rahul Gandhi) निवडणुकीनंतर 11जून रोजी न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचिका का दाखल केली गेली? -

याचिककर्ते नवीन झा यांनी 18 मार्च 2018 रोजी काँग्रेसच्या(Congress) पूर्ण सत्रात राहुल गांधींकडून भाजपविरोधात करण्यात आलेल्या विधानानंतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांनी राहुल गांधींच्या त्या विधानाचा उल्लेख केला होता, ज्यामध्ये भाजपवर जोरदार टीका केली गेली होती.

तर राहुल गांधीचे वकील कौशिक सर्खेल यांनी म्हटले की, एकदा आमच्याकडे समन्स पोहचले तर आम्ही त्यांना वैयक्तिकरित्या हजर होण्याापासून सूट देण्यासाठी कोर्टाकडे अपील करू. कारण यापूर्वी अशाच प्रकारच्या दोन प्रकरणांमध्ये वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासून सूट दिली गेली होती.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? -

राहुल गांधींनी म्हटले होते की, या देशातील लोक सत्तेच्या नशेत धुंद भाजपच्या(BJP) खोटं बोलणाऱ्या नेतृत्वाला स्वीकारतील, कारण त्यांना माहीत आहे की भाजप काय करत आहे. राहुल गांधी हेही म्हटले होते की, ते हत्येच्या आरोपी व्यक्तीला भाजपचा अध्यक्ष म्हणून स्वीकारतील, परंतु काँग्रेस पक्षातील लोक हे कधीच स्वीकारणार नाहीत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT