Prashant Kishor News : पुन्हा मोदी सरकार आल्यास पेट्रोल, डिझेलवरही GST? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 : मोदी सरकारविरोधात मतदारांमध्ये नाराजी दिसून येत नाही. त्यामुळे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला आहे.
Prashant Kishor
Prashant KishorSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor News) यांनी मोठा दावा केला आहे. देशात मोदी सरकारविरोधात (Modi Government) नाराजी दिसून येत नाही. उत्तर भारतात भाजपला मागील निवडणुकीप्रमाणेच विजय मिळेल, असे सांगत प्रशांत किशोर यांनी पुन्हा नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi) पंतप्रधान होतील, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील धोरणांबाबतही त्यांनी काही मोठे संकेत दिले आहेत.

प्रशांत किशोर यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखती हे दावे केले आहेत. प्रशांत किशोर म्हणाले, मोदी सरकार आपला तिसरा कार्यकाळ धुमधडाक्यात सुरू करेल. (Lok Sabha Election 2024) देशाच्या आर्थिक सुबत्तेवर सरकारकडून अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. केंद्राला इंधन, मद्य आणि जमीनविषयक कामांतून मोठा महसूल मिळतो. सरकारने पुढील काळात पेट्रोलियम पदार्थांचा समावेश जीएसटी मध्ये केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. (Prashant Kishor Latest News)

Prashant Kishor
Lok Sabha Election 2024 : दिल्ली काबीज कशी करणार? केजरीवालांपासून राहुल चार हात लांबच...

सध्या पेट्रोल (Petrol), डिझेल आणि नॅचरल गॅसवर जीएसटी नाही. मात्र, त्यावर व्हॅट, केंद्रीय विक्रीकर आणि अबकारी कर लागतो. उद्योग क्षेत्रातून पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीमध्ये (GST) आणण्याची मागणी केली जाते. मात्र, राज्यांकडून त्याला विरोध आहे. निधीबाबत मोठ्या प्रमाणात केंद्रावर अवलंबून राहावे लागेल, अशी भीती राज्यांना आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपला 303 जागा

लोकसभा निवडणुकीत भाजपने (BJP) 400 पारचा नारा दिला आहे. पण एनडीएल मागील निवडणुकीएवढ्याच 303 च्या जवळपास जागा मिळतील, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. 400 पारची घोषणा ही भाजपची रणनीती आहे. विरोधक त्यामध्येच अडकून पडले. मोदींविरोधात देशात नाराजी दिसत नाही. त्यामुळे पुन्हा मोदी सत्तेत येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिणेत वाढणार जागा

मागील निवडणुकीत भाजपला दक्षिणेकडील राज्यांमध्ये अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र, यावेळी या राज्यांमध्ये भाजपला 10 ते 15 जागांचा फायदा होऊ शकतो. तर उत्तर भारतातही भाजप मागील निवडणुकीप्रमाणेच चांगली कामगिरी करेल, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे.

Prashant Kishor
Abhijit Gangopadhyay News : ममतांविषयी वादग्रस्त विधान भोवलं; निवृत्त न्यायाधीशांना निवडणूक आयोगाचा दणका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com