Government theft : भारतीय निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेस नेते राहुल गांधी हरियाणासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सरकार चोरीचा आरोप केला. आता बिहारमध्येही हेच होणार असल्याचा दावा राहुल यांनी केला. सरकार चोरीची एक ‘व्यवस्था’ तयार करण्यात आली असून त्यामाध्यमातून भारताची लोकशाही संपविली आहे. संविधानावर हे आक्रमण असल्याची टीका राहुल गांधींनी यावेळी केली.
हरियाणातील सरकारची चोरी झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. त्यासाठी त्यांनी मतदारयादीमध्ये अनेक घोळ करण्यात आल्याचा आरोप केला. प्रामुख्याने पाच प्रकारे ही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये मतदारांचे चुकीचे चुकीचे फोटो, ब्लर फोटो, इतर राज्यांतील भाजप नेते, पदाधिकारी, मतदारांची दुसऱ्या राज्यांत नोंदणी, वगळण्यात आलेले मतदार आणि घर क्रमांक शून्यवर मतदार नोंदणी याचा पाच गोष्टींचा समावेश आहे.
हरियाणासह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्येही अशीच सरकारचोरी झाल्याचा आरोप राहुल यांनी केला. हरियाणामध्ये २ कोटी मतदार असून २५ लाख मतांची चोरी झाली आहे. हरियाणात ८ पैकी एक मतदार बोगस असून हा आकडा १२.५ टक्के एवढा आहे. एक फोटो, एक मतदारसंघ, शंभर मते, अशी स्थिती होती. ही व्यवस्था करण्यात आली होती. या महिलेच्या नावावर कुणीही मतदान करू शकते, अशी व्यवस्था करण्यात आली होती, असा आरोप राहुल यांनी केला.
एक महिलेचे विधानसभा निवडणुकीत २२३ वेळा दोन मतदान केंद्रांवर नाव आहे. लोकसभा निवडणुकीत तिचे एकाच मतदान केंद्रांवर २२३ वेळा नाव होते. तिचे नाव, पत्ता, वय वेगवेगळे आहे. हे केवळ एकच उदाहरण नाही. अशी हजारो उदाहरणे हरियाणात आहेत. हे लपविण्यासाठीच निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुजेट देत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
अनेक मतदारांची नावे एकाच मतदारसंघात वेगवेगळ्या बूथवर असल्याचेही आढळून आले. निवडणूक आयोगाकडे दुबार मतदार शोधण्यासाठी सॉफ्टवेअर आहे. पण त्यांनी हे केले नाही. कारण ते भाजपला मदत करत आहेत. त्यांनी दुबार मतदार हटवले हे निवडणूक पारदर्शक होईल. पण आयोगाला नको आहे, असे राहुल म्हणाले.
घर क्रमांक शून्य आम्ही प्रत्यक्ष संबंधित व्यक्तीला पाहिले, ते कुठे राहतात, याची खात्री केली. त्यांचे घरही आम्ही शोधले. हे केवळ एकच नाही, अशी हजारो उदाहरणे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त देशातील लोकांशी खोटं बोलत आहेत. हे होमलेस मतदार नाहीत. ही चूक नाही, जाणीवपूर्वक केलेले आहे. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षाच्या घरात ६६ लोक राहत असल्याचे मतदारयादीतील पत्त्यांवरून दिसते. अशी अनेक उदारहणे असून आम्ही त्याची खात्री केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
निवडणूक आयोगाची पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबत पार्टनरशिप असून त्यांनी लोकशाही संकटात टाकली आहे. हरियाणात काँग्रेसचा विजय होऊ नये, यासाठी मतचोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. आता बिहारमध्येही असेच होणार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.