"IANS Matrize pre-poll survey indicates low seat count for NDA’s Chirag Paswan and Congress in the upcoming Bihar Assembly elections."
"IANS Matrize pre-poll survey indicates low seat count for NDA’s Chirag Paswan and Congress in the upcoming Bihar Assembly elections."Sarkarnama

Bihar Elections update : PM मोदींसह तेजस्वी यादव यांच्या विश्वासाला तडा जाणार; मतदानाआधी आला धक्कादायक सर्व्हे

IANS Matrize Survey Predicts Tough Battle in Bihar Assembly Election : सर्व्हेमध्ये पीएम मोदींचे हनुमान म्हणून स्वत:ची ओळख सांगणारे केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे.
Published on

Congress from INDIA Alliance Faces Setback in Survey Predictions : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्य टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधीच एनडीएचे टेन्शन वाढविणारा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये राज्यात एनडीएची सत्ता येणार असल्याचे संकेत दिले जात असले तरी एका मित्रपक्षाच्या सुमार कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीतीही सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे.

IANS-MATRIZE ने केलेल्या सर्व्हेमध्ये राज्यात पुन्हा एनडीएलाच बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. ‘एनडीए’ला 153 ते  164 जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते व मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला केवळ 76 ते 87 जागांवरच समाधान मानावे लागू शकते.    

सर्व्हेमध्ये पीएम मोदींचे हनुमान म्हणून स्वत:ची ओळख सांगणारे केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. त्याचा फटका एनडीएलाही बसू शकतो. एनडीएला मिळणाऱ्या एकूण जागा कमी होण्याचा अंदाज आहे. पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

"IANS Matrize pre-poll survey indicates low seat count for NDA’s Chirag Paswan and Congress in the upcoming Bihar Assembly elections."
Shashi Tharoor News : शशी थरूर यांच्यामुळे राजकारणात वादळ; भाजप नेता म्हणाला, माझ्यासोबत काय झाले, हे तुम्हाला माहित...

जागावाटपादरम्यान पासवान यांनी जोरदार फिल्डींग लावली होती. त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील शंभर टक्के स्ट्राईक रेट दाखविला होता. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकला होता. त्यामुळे भाजपने एक पाऊल मागे घेत त्यांना 29 जागा दिल्या. पण प्रत्यक्षात या निवडणुकीत पासवान यांचा करिष्मा चालणार नसल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे.

दुसरीकडे एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या जीतनराम मांझी यांच्या पक्षाला जागावाटपात केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. मात्र, त्यांचे चार ते पाच उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट 90 टक्के राहण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास चिराग पासवान यांचे राज्यात किंगमेकर होण्याचे स्वप्न धुळीस मिळू शकते.

"IANS Matrize pre-poll survey indicates low seat count for NDA’s Chirag Paswan and Congress in the upcoming Bihar Assembly elections."
Code of Conduct : आचारसंहिता संपूर्ण महाराष्ट्रासाठी की काही भागापुरतीच? वाचा आयोगाने दिलेली अधिकृत माहिती...

काँग्रेसला जोर का झटका

निवडणुकीत काँग्रेसला जोरदार झटका बसण्याचा अंदाज आहे. पक्षाने 62 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यापैकी केवळ 7 ते 9 उमेदवारांचा विजय होऊ शकतो, असे सर्व्हेत म्हटले आहे. असे झाल्यास तेजस्वी यांच्यासाठी हा मोठा झटका असेल. मागील निवडणुकीतही काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने तेजस्वी यांना सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. आताही तीच भीती व्यक्त केली जात आहे. त्याचीच पुनरावृत्ती झाल्यास इंडिया आघाडीमध्ये फूट पडण्याचीही भीती नेत्यांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com