Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांनी माफीचा साक्षीदार व्हावे, PM मोदी-शहांची चौकशी..! राहुल गांधींच्या विधानाने राजकारणात खळबळ

Narendra Modi, Amit Shah, Election Commission of India, Chief Election Commissioner : ज्ञानेश कुमार स्वतंत्रपणे काम करत नाहीत. त्यांच्यावर नियंत्रण आहे. त्यांच्यावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा दबाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Rajanand More

ECI controversy latest news : केंद्रीय निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांचे विविध मुद्द्यांवर आक्षेप आणि आयोगातील मतभेद उघड झाल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत हल्ला चढविला.

संविधान-कायदे-संस्था-मतदान ही साखळी आतापर्यंत कधीही तुटली नव्हती. ती तुटली असेल तर त्याला मोदी, शहांसह ज्ञानेश कुमार जबाबदार आहेत, असे सांगत राहुल गांधी म्हणाले, हे एक षडयंत्र असून त्याच्या केंद्रस्थानी नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही आहेत. त्यांच्या या कृत्याची चौकशी केली जाईल. जनतेविरोधात केलेले हे कृत्य देशद्रोह असून आम्ही शांत बसणार नाही. ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

ज्ञानेश कुमार स्वतंत्रपणे काम करत नाहीत. त्यांच्यावर नियंत्रण आहे. त्यांच्यावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा दबाव आहे. निवडणूक आयोग वोट चोरी करत आहे, हे मी तीन वर्षांपासून सांगतोय. आता दोन निवडणूक आयुक्तच बोलले आहेत. आम्ही जे म्हणत होतो ते दोन आयुक्तांनीही मान्य केले आहे. देशाच्या इतिहासात अशाप्रकारे लोकशाहीवर असे आक्रमण झालेले नाही. पुढील तीन-चार महिन्यांत तु्म्हाला हे दिसू लागेल. कारण पुरावे आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

ज्ञानेश कुमार यांच्या दोन निवडणूक आयुक्तांनी वोट चोरी होत असल्याचे एकप्रकारे मान्य केले आहे. त्यामुळे आता ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे, असा सल्ला मी त्यांना देतो. देशद्रोह्यांना शिक्षा मिळेल. पुढील तीन-चार महिन्यांत तुम्हाला दिसू लागेल. कारण आमच्याकडे माहिती आहे. मी देशवासियांना आश्वस्त करतो की, नरेंद्र मोदी आणि शहांची या गुन्ह्यासाठी चौकशी केली जाईल, असे राहुल म्हणाले.

देशात अशी स्थिती यापूर्वी कधीच झाली नव्हती. आधुनिक भारताच्या इतिहासात ही साखळी कधी तुटली नव्हती. ही यंत्रणा दुरूस्त झाल्यानंतर मोदी, शहांची चौकशी होईल. ते स्वत:ची चौकशी कशी करू शकतात? ही यंत्रणा खराब झाली आहे. लोक आतापर्यंत घाबरत होते. पण आता ती भीती कमी झाली आहे. कारण निवडणूक आयुक्तच बोलू लागले आहेत. यावर शांत बसणे म्हणजे देशविरोधी कृती असेल, असे स्पष्ट करत राहुल यांनी आता देशभरात रान पेटविण्याचे संकेत दिले आहेत.

विरोधी पक्षांमध्ये वोट चोरीवर एकमत असल्याचेही राहुल यांनी स्पष्ट केले. वोटचोरी रोखण्यासाठी प्रत्येक जण सोबत आहे. भाजपमधील लोकही असं म्हणत आहेत. आम्ही सर्व मिळून यावर काम करू. संविधान आणि मतांचे संरक्षण करण्याचे काम आम्ही करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

मतदारयाद्यांवर निवडणूक आयोगाचे नियंत्रण आता राहिले नाही. मतदारयाद्यांवरील विश्वास आयोगाने घालविला आहे. आयोगामध्येच याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोग आता जे काही सांगत आहे, त्यावर आमचा विश्वास नाही. आयोगामध्ये आता मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे. पण हे सरकार करू शकत नाही. आता सरकार बदलल्यानंतरच हे शक्य आहे. लोकांचाही आता आयोगावरील विश्वास उडाला आहे. भाजप आता विजयी झाले तरी लोकांनाही आता विश्वास बसणार नाही, असे राहुल म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT