Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
देश

Gujarat Election News : गुजरातमध्ये राहुल गांधींची जादू चालणार? सर्व्हेमध्ये आश्चर्यकारक निष्कर्ष समोर

सरकारनामा ब्यूरो

Gujarat Election : गुजरात विधानसभा निवडणुकीचा (Gujarat Election) प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. सगळ्याच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. गुजरातची सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची सध्या 'भारत जोडो' यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधी यांनी गुजरामध्ये प्रचार सभा घेतली होती.

या प्रचार सभेनंतर गुजरात निवडणुकीसंदर्भात शेवटच्या आठवड्यातील एक सर्व्हे समोर आला आहे. यामुळे सर्व्हेमध्ये नागरिकांनी आश्चर्यकारक उत्तर दिले आहे. राहुल गांधी हिमाचलच्या निवडणुकीत प्रचारासाठी गेले नव्हते. त्यामुळे ते गुजरातमध्ये जाणार की नाही, या विषयी अनेक प्रश्न विचारले जात होते. मात्र, त्यांनी गुजरातमध्ये दोन प्रचार सभा घेत, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.

राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सभेमुळे गुजरातचे वातावरण बदलेल का? की, राहुल गांधींनी गुजरातमध्ये प्रचारासाठी फारच उशीर केला का? असे प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले होते. या संदर्भात सी-व्होटर आणि एबीपी माझाने सर्व्हे केला आहे. गुजरातमध्ये 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात सौराष्ट्रातील 54 आणि दक्षिण गुजरातमधील 35 जागांवर मतदान होणार आहे.

या सर्वेक्षणात 1 हजार 889 लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. बुधवार ते शुक्रवार या कालावधीत हे सर्व्हेक्षण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राहुल गांधींच्या प्रचारामुळे गुजरातचे वारे बदलणार का? या प्रश्नाचे आश्चर्यकारक निष्कर्ष सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. सर्व्हेक्षणात 41 टक्के लोकांनी होय, असे उत्तर दिले आहे. तर राहुल गांधींच्या प्रचाराने गुजरातचे वारे बदलणार नाही, असे 59 टक्के लोकांचे मत या सर्व्हेमध्ये नोंदवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT