Jay Narayan Vyas : भाजपचा बडा नेता, माजी मंत्री काँग्रेसमध्ये ; ३२ वर्षांनंतर भाजपला सोडचिठ्ठी

Jay Narayan Vyas : अहमदाबाद येथे कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)यांच्या उपस्थितीत जय नारायण व्यास यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Jay Narayan Vyas latest news
Jay Narayan Vyas latest news sarkarnama

Jay Narayan Vyas : गुजरात निवडणुकीच्या (Gujarat Assembly Elections 2022) रणधुमाळीत भाजपला (BJP)मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री जय नारायण व्यास यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत सोमवारी कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे. (Jay Narayan Vyas latest news)

७५ वर्षीय जय नारायण व्यास यांनी पाच नोव्हेंबर रोजी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर व्यास आणि त्यांचे सुपुत्र समीर व्यास यांनी अहमदाबाद येथे कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि गुजरात काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे.जय नारायण व्यास हे भाजपचे विश्वासू मानले जात होते. केशुभाई आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा जय नारायण व्यास हे दोन्ही सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. ते आरोग्यमंत्री होते.

Jay Narayan Vyas latest news
Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांच्यावर एमआयएमने सोपवली मोठी जबाबदारी..

२०१७ मध्ये भाजपने त्यांचे तिकीट कापले होते. त्यांना या निवडणुकी तिकीट मिळेल अशी त्यांना आशा होती. पण त्यांची निराशा झाली. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. आपल्या समर्थकांशी चर्चा करुन काँग्रेस किंवा आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते.

गुजरात निवडणुकीत भाजपसमोर बंडखोर आमदारांचे आव्हान आहे. तिकीट न दिल्याने १८ जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे.या सर्व उमेदवारांनी थेट भाजपच्याच उमेदवारांसमोर दंड थोपटल्यामुळे भाजपची डोकेदुःखी वाढली आहे. या सर्व बंडखोरांना भाजपने निलंबित केलं आहे.

या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपचे १८ बंडखोरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे २०२२ ची निवडणूक ही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरेल, तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच गुजरात विधानसभेत एन्ट्री केल्याने ही निवडणूक भाजपसाठी अटीतटींची होणार आहे, यात शंका नाही. आपची एन्ट्री ही कॉंग्रेस आणि भाजपसाठी मोठे आव्हान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com