Union Minister Ravneet Singh Bittu criticized Rahul Gandhi : भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे आता राजकीय वातावरण तापलं आहे. केंद्रीयमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी देशातील नंबर-1दहशतवादी आहेत. मला वाटतं त्यांना पकडण्यासाठी इनामही असायला हवा.'
केंद्रीयमंत्री बिट्टू यांचे हे विधान राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान धार्मिक स्वातंत्र्य आणि शीख समुदायावर केलेल्या टिप्पणीवरील प्रत्युत्तर आहे. त्यांनी राहुल गांधींवर आधी मुस्लिम आणि आता शीख समुदायावर निशाणा साधून देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
याशिवाय केंद्रीयमंत्री रवनीतसिंह बिट्टू यांनी म्हटले की, राहुल गांधी भारतीय नाहीत. त्यांनी(राहुल गांधी) आपला बहुतांश काळ हा देशाबाहेरच घालवला आहे. तिथे त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार आहे. यामुळेच त्यांना आपल्या देशाबाबत जास्त प्रेम नाही. राहुल गांधी देशाबाहेर जावून काहीही उलटसुलट बोलतात. आता तर राहुल गांधी कधी ओबीसी, कधी जातींबाबत बोलतात. काँग्रेसने(Congress) मुस्लिमांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फायदा झाला नाही. म्हणून आता ते शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
याचबरोबर बिट्टू यांनी हेही म्हटले की, 'जो देशाचा वाँटेड आहे आणि तो जे म्हणतो, तेच राहुल गांधी बोलतात. आता बॉम्ब-दारूगोळा बनवाणारे जे फुटीरतावादी आहेत, त्यांनी आता राहुल गांधींच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे आणि त्यांचं म्हणणं राहुल गांधींनी मांडलं आहे.'
तसेच 'जे प्रत्येक क्षणी लोकांना मारण्याचा प्रयत्न करतात, बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या देतात, ते लोक जेव्हा राहुल गांधींच्या समर्थनार्थ आले, तेव्हा समजावं की देशातील नंबर-1 दहशतवादी राहुल गांधी आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी मोठी इनाम असायला हवा.' अशा शब्दांमध्ये केंद्रीयमंत्री बिट्टू यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.