Haryana BJP News : भाजपचे नेते वरिष्ठ नेते आणि हरियाणाचे माजी गृहमंत्री अनिल विज यांनी रविवारी म्हटले की, राज्यात 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर जर भाजपचे सरकार सत्तेत आले तर ते मुख्यमंत्रिपदासाठी दावा सांगणार आहेत. तर दुसरीकडे भाजपने आधीच स्पष्ट केलेलं आहे की, जर पक्ष सत्तेत आला तर नायबसिंह सैनी हे मुख्यमंत्री असतील.
सहाव्यांदा आमदार झालेले अनिल विज(Anil Vij ) यांनी म्हटले की, मी आजपर्यंत पक्षाकडे कधीच काही मागितले नाही. हरियाणाचे लोक मला भेटण्यासाठी येत आहेत. एवढच नाहीतर अंबाला येथेही लोक मला म्हणतात की मी सर्वात वरिष्ठ आहे, परंतु मुख्यमंत्री बनलो नाही. लोकांची मागणी आणि ज्येष्ठतेच्या आधारावर यंदी मी मुख्यमंत्री बनण्यासाठी दावा सादर करेल.
अंबाला कँट येथून आमदार राहिलेले विज म्हणाले की, पक्ष मला मुख्यमंत्री बनवेल की नाही, ते त्यांच्यावर अवलंबून आहे. पण जर त्यांनी मला मुख्यमंत्री बनवलं, तर मी हरियाणाचे नशीब आणि चेहरामोहरा बदलेल.
अंबालामध्ये मीडियाशी बोलताना केलेल्या टिप्पणीवर स्पष्टीकरण मागितल्यावर, विज यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, मी पक्षाचा सर्वात वरिष्ठ आमदार आहे आणि सहा निवडणुका जिंकल्या आहेत. तसेच सातवी निवडणूक लढवत आहे. मी आतापर्यंत माझ्या पक्षाकडे कधीच काही मागिलेलं नाही.
विज यांनी म्हटले की, परंतु संपूर्ण हरियाणात(Haryana ) आणि माझ्या निवडणूक मतदारसंघातील लोक मला भेटत आहेत. मी मुख्यमंत्रिपदासाठी दावा सादर करेल. यावर निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला घ्यायचा आहे.
निवडणुकीसाठी आता काही आठवडेच शिल्लक आहेत. अशावेळी त्यांच्या निर्णयाबाबत विचारणा झाल्यावर विज म्हणाले की, लोक त्यांना भेटल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात मनोहर लाल खट्टर यांच्या जागी सैनी यांना मुख्यमंत्री बनवल गेलं होतं. हरियाणाच्या ९० विधानसभा जागांसाठी पाच ऑक्टोबर रोजी मतदान होईल आण मतमोजणी आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.