Late Indira Gandhi, Sonia Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi's Disqualification As MP : खासदारकी सोडावी लागलेले राहुल गांधी त्यांच्या कुटुंबातले तिसरे सदस्य

India Gandhi : वायनाडमध्ये होणार पोटनिवडणूक

सरकारनामा ब्युरो

Sonia Gandhi : केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व काँग्रेसचे नेते राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाली. कर्नाटकमधील कोलार येथे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी अडनाव असणाऱ्या व्यक्ती चोर का असतात? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्यांनी नीरव मोदी, ललीत मोदी व विजय मल्ल्या यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. मात्र गांधींच्या वक्तव्यावरून मोदी अडनाव असलेल्या व्यक्तींची बदनामी झाली, असा अरोप करीत सूरत न्यायालयात गांधीविरोधात मानहानीचा खटला सुरू झाला. त्यावरून सूरत न्यायालयाने राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

लोकप्रतिनिधी कायदा, १९५१च्या कलम ८(३) नुसार, ज्या क्षणी खासदाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवले जाते आणि त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा होते, तेव्हा ती किंवा तो खासदार म्हणून अपात्र ठरतो. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी (ता. २४) काँग्रेस नेते राहुल गांधी यापुढे संसदेचे सदस्य नाहीत, असे जाहीर केले.

सूरत न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अपात्र ठरवून त्यांचा वायनाड मतदारसंघ रिक्त घोषित केला आहे. आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल असली तरी गांधी कुटुबांतील ते अशी कारवाई होणारे तिसरी व्यक्ती आहेत. यापूर्वी राहुल गांधींच्या आज्जी, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्यावरही खासदारकीला हात धुण्याची वेळ आली होती.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. मात्र ती कारवाई त्यांच्यासाठी संजीवनीच ठरली होती. त्या घटनेला आणीबाणीची पार्श्वभूमी होती. आणीबाणीनंतर निवडणुका झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतरचा १९७७-७८ चा काळ खूपच नाट्यमय होता. पराभवानंतर इंदिरा गांधी १९७८ मध्ये कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणूक जिंकून लोकसभेत पोहोचल्या. तेथे मात्र त्यांच्या 'खास स्वागता'साठी विरोधकांनी 'फिल्डिंग'च लावली होती.

इंदिरा गांधी १८ नोव्हेंबर रोजी लोकसभेत पोहचल्या होत्या. त्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई (Moraraji Desai) यांनी स्वतः इंदिरा गांधीविरोधात प्रस्ताव मांडला. त्यात इंदिराजींनी त्यांच्या कार्यकाळात सरकारी अधिकार्‍यांचा अपमान केला, आपल्या पदाचा गैरवापर केला असे आरोप केले होते. त्यानंतर सात दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर गांधींच्या विरुद्ध विशेषाधिकार समिती स्थापन करण्यात आली.

त्या समितीकडे कार्यालयीन प्रकरणासह इंदिराजींवर झालेल्या अनेक आरोपांची चौकशी करून महिनाभरात अहवाल देण्याची जबाबदारी होती. त्यानुसार विशेषाधिकार समितीने इंदिराजींवरील आरोप खरे आहेत. त्यांनी आपल्या विशेषाधिकारांचे उल्लंघन केले. तसेच सभागृहाचा अवमान केल्याचे सांगितले. त्यानंतर इंदिराजींना संसदेतून बाहेर काढण्यात आले. त्यांना अटक करून तिहार तुरुंगात नेले. दरम्यान, दुहीमुळे मोरारजी देसाई सरकार तीन वर्षांतच कोसळले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत बहुमत प्राप्त करून १९८० मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या.

सोनिया गांधींना 'लाभाचं पद' भोवलं

राहुल गांधींच्या आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना २००६ मध्ये लाभाच्या पदावरुन खासदारकी गमवावी लागली होती. त्यावेळी सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार होत्या. तसेच त्या यूपीए सरकारच्या काळात स्थापन झालेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा होत्या. ज्याला विरोधकांनी 'लाभाचे पद' असे संबोधले होते. देशात यूपीएची सत्ता असतानाही काँग्रेस अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी यांना विरोधकांनी लाभाच्या पदावरुन घेरले. त्यामुळे सोनिया गांधींना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी रायबरेलीमधून पुन्हा निवडणूक लढवून पुन्हा खासदार झाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT