Rahul Gandhi Skip Red Fort Independence Day Event sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधी लाल किल्ल्यावरील समारंभाला उपस्थित का नव्हते? काँग्रेस कार्यालयात केलं झेंडावंदन

Rahul Gandhi Skip Red Fort Independence Day Event : स्वातंत्र्यदिना निमित्त लाल किल्यावर आयोजित समारंभाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी गैरहजर होते. त्यामागचे कारण समोर आले आहे.

Roshan More

Rahul Gandhi News: स्वातंत्र्यदिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजरोहन करत देशाला संबोधीत केले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देखील निमंत्रण होते. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. काँग्रेस अध्यक्ष, राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे हे देखील या सभांरभाला गैरहजर होते.

काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांनी लाल किल्ल्यावरील समारंभाला गैरहजर राहण्याचे कारण समोर आले आहे. 'आज तक' या हिंदी वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या दोनही नेत्यांनी समारंभातील बैठक व्यवस्थेवर तसेच प्रोटोकाॅलवर नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षनेत्याच्या पहिल्या रांगेत स्थान असते. या समारंभामध्ये विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांना पहिला रांगेतील बैठक व्यवस्थेत स्थान दिले जात नाही. 2024 मध्ये स्वतंत्र दिनाच्या समारंभासाठी राहुल गांधी आले होते तेव्हा त्यांना चौथ्या रांगेत स्थान देण्यात आले होते. तेव्हा त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली होती.

संरक्षण मंत्रायलयाकडून खुलास करत सांगण्यात आले होते की, ऑलंपिक खेळाडू्ंच्या जागेसाठी बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते.

काँग्रेस कार्यालयात झेंडावंदन

दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात झेंडावंदन करण्यात आले. यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी उपस्थित होते. खर्गे यांनी आपल्या भाषणात झेनझी मागे आम्ही ठामपणे उभे राहू, असे सांगितले. तर, राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियामधून स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा देताना म्हटले की, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या स्वतंत्र मिळून दिले हे फक्त भेट नाही तर जबाबदारी आहे. ही जबाबदारी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची, संविधान, तिंरंगा आपल्या ह्रदयात ठेवत लोकशाहीची रक्षा करण्याची.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT