Election Commission, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Election Commission on Rahul Gandhi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’च्या राहुल गांधींच्या आरोपवर निवडणूक आयोगाचेही कडक उत्तर, म्हटले...

Election Commission responds Rahul Gandhi’s match-fixing allegations - राहुल गांधी यांनी पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे गैरप्रकार झाला हे सांगितले आहे. ज्यावर आता निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Mayur Ratnaparkhe

Rahul Gandhi’s Allegations in Maharashtra Assembly Elections -लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मागील वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचे केलेले दावे, आज निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. एवढंच नाहीतर मतदारांकडून अनुकूल निकाल न मिळाल्याने निवडणूक आयोगाची बदनामी करणे पूर्णपणे हास्यास्पद असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या त्या लेखाला निवडणूक आयोगाकडून उत्तर दिले गेले आहे, ज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप केला गेला आहे.

आयोगाने काय म्हटले? -

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, कोणाही चुकीची माहिती पसरविल्याने निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी होते आणि मोठ्या प्रक्रियेसाठी अथक परिश्रम करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचते. तसेच, महाराष्ट्राच्या मतदार यादीबाबत केलेले निराधार आरोप कायद्याच्या राज्याचा अनादर करतात.

काय म्हणाले राहुल गांधी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे निवडणूक कशी चोरली जाते याची ब्लू प्रिंट होती. पहिला टप्पा निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी पॅनेलमध्ये घोटाळा करणे हा होता. दुसऱ्या टप्प्यात मतदार यादीत बोगस मतदरारांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवली गेली. चौथ्या टप्प्यात भाजपला जिथे जिंकणे अशक्य होते तिथे बनावट मतदान करून घेण्यात आले. तर पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात सगळे पुरावे लपविले गेले, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

महाराष्ट्रात भाजप इतका हतबल का झाला होता, हे समजणे अवघड नाही. ही हेराफेरी मॅच फिक्सिंगसारखी आहे, फसवणूक करणारा पक्ष खेळ जिंकतो, परंतु संस्थांना नुकसान पोहोचवतो. निकालावरील जनतेचा विश्वास नष्ट करतो. सर्व चिंतित भारतीयांनी पुरावे पहावेत. स्वतः निर्णय घ्या. उत्तरे मागा. कारण महाराष्ट्राची मॅच फिक्सिंग आता बिहारमध्ये होईल आणि नंतरही जिथे-जिथे भाजपला पराभवाची भीती वाटते तिथे होईल, अशीही भीती गांधी यांनी व्यक्त केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT