Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Left Govt Home : राहुल गांधींनी मुक्काम हलविला; आता १० जनपथवर राहणार

सरकारनामा ब्युरो

Rahul will Shift with Mother Sonia : काँग्रेस नेते, माजी खासदार राहुल गांधी यांनी 'मोदी अडनावा'वरून वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून सूरत सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल होता. त्यात न्यायालयाने गांधींना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. खासदारकी रद्द झाल्यानंतर २७ मार्च रोजी लोकसभा गृहनिर्माण समितीने राहुल यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवली. समितीने त्यांना २२ एप्रिलपर्यंत १२ तुघलक रोड येथील सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले. त्यानुसार गांधी यांनी बंगला रिकामा केला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २२ एप्रिलपर्यंत बंगला सोडण्याची मुदत देण्यात आली होती. त्यांनी मात्र या मुदतीपूर्वीच बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी सकाळपासून दिल्लीतील १० तुघलक लेन येथील राहुल गांधींचा सरकारी बंगला रिकामा केला आहे. त्यांनी आपले सर्व साहित्य एका टेम्पोतून नेल्याची माहिती आहे. राहुल यांनी बंगला रिकामा करून सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निवासस्थानी राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राहुल बेघर झाल्यानंतर अनेक समर्थकांनी पोस्टर घेऊन त्यांना आपल्या घरी राहण्यास येण्याचे आवाहन केले होते. एका समर्थकाने त्यांचे चार मजली घर राहुल गांधींच्या नावे केले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर आपल्या पूर्वीच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडला (Wayanad) भेट दिली. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले होते की, "भाजप माझा खासदारकीचा टॅग काढू शकते. मला तुरुंगात टाकू शकतात. माझे घर हिरावून घेऊ शकतात, मात्र वायनाडमधील जनतेच्या ह्रदयातून काढू शकत नाही."

सूरत न्यायालयाने (Surat Court) सुनावलेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर गुरुवारी (ता.१३) सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल २० एप्रिल रोजी सुनावला जाणार आहे.

दरम्यान, मानहानी खटल्याप्रकरणी राहुल गांधी यांना २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. शिक्षा जाहीर झाल्यानंतर काही वेळातच त्यांना ३० दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT