Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi net worth : राहुल गांधींकडे नेमकी संपत्ती किती ? केवळ एका वर्षातील कमाईचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

Rahul Gandhi annual income details : राहुल गांधींची एकूण संपत्ती, वार्षिक उत्पन्न, मालमत्ता आणि जाहीर केलेल्या आर्थिक तपशीलांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. एका वर्षातील कमाईचा आकडा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Rashmi Mane

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एकूण संपत्ती किती आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो. लोकसभा निवडणूक 2024 साठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःची एकूण संपत्ती 20.39 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. 2019 मध्ये हीच संपत्ती 15.88 कोटी रुपये होती. म्हणजेच मागील 5 वर्षांत त्यांच्या मालमत्तेत सुमारे 5 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, गेल्या 5 वर्षांत त्यांचे एकूण उत्पन्न सुमारे 6 कोटी रुपये इतके राहिले आहे. या उत्पन्नातील मोठा हिस्सा गुंतवणुकीतून आणि इतर स्त्रोतांमधून मिळालेला आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी संपत्ती असूनही त्यांच्या जवळ केवळ 55 हजार रुपये रोख रक्कम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच 2 बँक खात्यांमध्ये मिळून 26.25 लाख रुपये जमा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गुंतवणुकीच्या बाबतीत राहुल गांधी यांनी 25 कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. या शेअर्सची एकूण किंमत 4.33 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधील हा मोठा भाग मानला जातो. याशिवाय ‘यंग इंडियन’ कंपनीचे 100 रुपये दर्शनी मूल्य असलेले 1900 शेअर्स त्यांनी जाहीर केले असून त्यांची एकूण किंमत 1.90 लाख रुपये आहे.

म्युच्युअल फंडमध्येही त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. 7 म्युच्युअल फंड योजनांमध्ये त्यांची 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तसेच सुमारे 15 लाख रुपयांचे गोल्ड बॉण्ड त्यांच्या नावावर आहेत. विमा पॉलिसींमध्ये 61.52 लाख रुपये गुंतवले असून 4.20 लाख रुपयांचे सोने व दागिनेही त्यांच्या मालकीचे आहेत. एकूण चल मालमत्ता 9.24 कोटी रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अचल संपत्तीबाबत पाहिले तर त्यांनी 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. दिल्लीतील महरौली परिसरातील सुलतानपूर गावात असलेली शेती जमीन त्यांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत खरेदी केली आहे. तसेच गुरुग्राम येथे 5,538 चौरस फूट क्षेत्रफळाचे कार्यालय त्यांच्या नावावर असून त्याची सध्याची बाजार किंमत सुमारे 9 कोटी रुपये आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कोणतीही गाडी नोंदणीकृत नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. कोट्यवधींची संपत्ती असतानाही वैयक्तिक वापराच्या मालमत्तेबाबत त्यांची प्रतिमा साधी असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT