Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : ओबीसी नव्हे, 'या' जातीत जन्मले! राहुल गांधी घसरले मोदींच्या जातीवर

Rajanand More

Odisha News : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. मोदींच्या जातीवरून त्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी ओबीसीमध्ये जन्मला आले नाहीत, तर खुल्या प्रवर्गात जन्माला आले होते. ते ओबीसीमध्ये जन्मला आल्याचे सांगून भाजप लोकांना मूर्ख बनवत असल्याची टीका त्यांनी केली. (Rahul Gandhi News)

भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) ओडिशामध्ये दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान राहुल यांनी लोकांशी संवाद साधला. मागील काही दिवसांपासून राहुल यांच्याकडून जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. सत्तेत आल्यास ५० टक्के आरक्षणाची (Reservation) मर्यादा काढून टाकण्याची घोषणाही त्यांनी नुकतीच केली आहे. मात्र, या यात्रेदरम्यान त्यांनी पहिल्यांदाच मोदींच्या (PM Narendra Modi) जातीवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले, भाजपकडून (BJP) लोकांना मूर्ख बनवले जात आहे. मोदीजी ओबीसीमध्ये जन्मला आले नाहीत. ते तेली समाजातील आहेत. भाजपने 2000 मध्ये तेली समाजाचा समावेश ओबीसीमध्ये केला होता. त्यामुळे मोदीजी ओबीसीमध्ये जन्माला आले नव्हते, ते खुल्या प्रवर्गात जन्माला आले होते. आपण ओबीसीमध्ये जन्माला आल्याचे ते जगाला खोटे सांगत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोज नवीन कपडे

मला माहिती आहे, ते ओबीसी नाहीत. कारण ते कोणत्याही ओबीसी व्यक्तीची गळाभेट घेत नाहीत. त्यामुळे ते जातीनिहाय जनगणनाही करणार नाहीत. दररोज कोटींचा सूट घालतात आणि स्वत:ला गरीब, फकीर म्हणतात. सकाळी नवीन ड्रेस, संध्याकाळी नवीन ड्रेस, रोज नवनवीन ड्रेस घालतात आणि स्वत:ला ओबीसी म्हणतात, अशी टीका राहुल यांनी केली.

दरम्यान, आज भारत जोडो न्याय यात्रा छत्तीसगडमध्ये प्रवेश करणार आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच या राज्यात येणार आहेत. त्यामध्ये त्यांच्या यात्रेबाबत उत्सुकता वाढली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT