New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन दिवस संसदेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सरकारकडून शनिवारी यूपीए सरकारच्या कार्यकाळाचा व्हाइट पेपर शनिवारी संसेदत सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी संसदेतच भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार आहे. सरकारच्या व्हाइट पेपरला काँग्रेसनं आज ब्लॅक पेपर काढून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावरही मोदींनी आज लगेच राज्यसभेत पलटवार केला. (Modi Government News)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या बजेट भाषणामध्ये व्हाइट पेपर सादर कऱण्याबाबत जाहीर केले होते. 2014 पूर्वी काँग्रेसच्या काळातील कामगिरी आणि त्यानंतरची मोदी सरकारच्या कामगिरी या व्हाइट पेपरमध्ये असेल. काँग्रेसच्या (Congress) काळातील बेशिस्तीवर प्रकाशझोत टाकण्याचा यामागे उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले होते.
काँग्रेसने आज व्हाइट पेपरला प्रत्युत्तर म्हणून ब्लॅक पेपर काढला. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी ब्लॅक पेपर काढत सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर राज्यसभेच्या कामकाजत सहभागी झाले. आज राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देण्यात आला. या वेळी पंतप्रधान मोदीही उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोदींनी (Narendra Modi) सदस्यांना निरोप देताना केलेल्या भाषणात काँग्रेसच्या ब्लॅक पेपरचा मुद्दाही काढला. या वेळी त्यांनी खर्गे यांच्यासह काँग्रेसला टोला लगावला. पंतप्रधान म्हणाले, कधी कधी काही कामे इतकी चांगली असतात, जी खूप वर्षे उपयोगात येतात. आपल्याकडे एखादा मुलगा चांगली कपडे घालून तयार होतो, तेव्हा त्याला घरातील लोक काळी तीट लावतात.
आज देश मागील दहा वर्षांत समृद्धीचे नवे शिखर पार करत आहे. भव्यदिव्य वातावरण बनले आहे. त्याला नजर लागू नये म्हणून काळी तीट लावण्याचा प्रयत्न केला आहे. मी त्यासाठी खर्गे यांचे आभार मानतो. प्रगतीच्या प्रवासाला नजर लागू नये, यासाठी तुम्ही ब्लॅक पेपर काढला आहे. मी त्याचे स्वागत करतो. जेव्हा चांगले काम होते, त्याला नजर लागू नये म्हणून काळी तीट आवश्यक असते. खर्गेंच्या वयाच्या व्यक्तीने हे काम केल्याने चांगले वाटले, असा टोला मोदींनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.