Rahul Gandhi in Opposition Party Meeting :  Sarkarnama
देश

Rahul Gandhi On BJP : भारतात दोन विचारधारा - एक भारत जोडा, दुसरीकडे 'देश तोडा'; राहुल गांंधीचा भाजपवर निशाणा!

सरकारनामा ब्यूरो

Opposition Party Meeting In Patna : आगामी २०२४ च्या लोकसभेसाठी रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राजद आणि आपसह डझनहून अधिक पक्षांच्या नेत्यांची आज (दि.२३ जून) पाटणा येथे बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गट शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, फारुख अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन पाटणा येथे पोहोचले आहेत. दरम्यान विरोधकांच्या या मेळ्यावर भाष्य करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी भाजपवर सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)

बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे विरोधकांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "देशात दोन विचारधारांमध्ये लढाई सुरू आहे, एकीकडे आमचा भारत जोडोचा विचार आहे आणि दुसरीकडे भाजपची भारत तोडो विचारधारा आहे. भाजप भारत तोडण्याचे, द्वेष आणि हिंसाचार पसरवण्याचे काम करत आहे. तर काँग्रेस जोडण्याचे काम करत आहे."

राहुल गांधी पुढे म्हणाले, "नरेंद्र मोदी आणि भाजपचा अर्थ केवळ १०-१२ बड्या लोकांचा फायदा करून देणे हाच आहे, तर काँग्रेसचा अर्थ देशातील गरिबांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यासाठी काम करणे आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी पाटण्यात पोहोचले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीसाठी पाटणा येथे दाखल झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विमानतळावर नेत्यांचे स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT