Devendra Fadnavis On Opposition meeting :  Uddhav Thackeray
Devendra Fadnavis On Opposition meeting : Uddhav ThackeraySarkarnama

Devendra Fadnavis News : सत्तेसाठी उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला जावून बसले; फडणवीसांनी केलं लक्ष्य!

Devendra Fadnavis On Opposition meeting : परिवार वाचवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले..
Published on

Mumbai News : आगामी २०२४ च्या लोकसभेसाठी रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राजद आणि आपसह डझनहून अधिक पक्षांच्या नेत्यांची आज (दि.२३ जून) पाटणा येथे बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गट शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, फारुख अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन पाटणा येथे पोहोचले आहेत. (Opposition Parties Meeting In Patna)

दरम्यान विरोधकांच्या या मेळ्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी आणि परिवार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्तीच्या बाजूला जावून बसले, अशी टीका फडणवीसांनी केली. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis On Opposition meeting :  Uddhav Thackeray
MVA In Patna Opposition Meeting: भाजपविरोधी बैठकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक प्रतिनिधी उपस्थित; तीन-तीन जणांना प्राधान्य

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषेदेत म्हणाले, "अशा प्रकारे विरोधकांनी कितीही मेळावे केले, त्याचा काही परिणाम आमच्यावर होणार नाही. देशातील जनता ही पंतप्रधान मोदींसोबत आहेत. हे विरोधक परिवारवाद पक्ष वाचवण्याकरता एकत्र आले आहेत. मात्र लोक मोदीजींना साथ देतील."

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. सातत्याने मेहबूबा मुफ्तीच्या नावावर भारतीय जनता पक्षाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता मेहबुबा मुफ्तीसोबत तर चाललेच आहेत. आता तर ते त्यांच्या बाजूला बसलेत. सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता, सगळ्या प्रकारचे तडजोड करण्यासाठी हे तयार झाले आहेत, पण याचा परिणाम होईल, असं वाटत नाही," अशा टीका त्यांनी ठाकरेंवर केली.

Devendra Fadnavis On Opposition meeting :  Uddhav Thackeray
Opposition Meeting in Patna : मोदी सरकारच्या विरोधात 'विरोधी' हुंकार; बैठकीपूर्वी शरद पवार म्हणाले...

दरम्यान, पाटणा येथे आज भाजपविरोधात देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. देशभरातील जवळपास १५ भाजपविरोधी पक्ष एकत्र येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकींसाठी रणनीती आखण्यात येणार आहे. या बैठकीत लोकभा निवडणुकीसाठी विरोधकांच्याप्रमुख नेत्याच्या चेहऱ्यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com