Rahul Gandhi Over Adani
Rahul Gandhi Over Adani  sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांवर नरेंद्र मोदी काय प्रत्युत्तर देणार ?..

सरकारनामा ब्युरो

Rahul Gandhi Over Adani : अदानी समूहाच्या प्रकरणावरून संसदेत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काल ( ७ फेब्रवारी ) लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अदाणी प्रकरणावरून (Rahul Gandhi Over Adani) केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं. त्यांच्या भाषणावर भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी माफी मागावी,यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज या प्रकरणावरुन पुन्हा संसदेत सत्ताधारी-विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “यात्रेत चालत असताना तरुणांनी विचारलं की, अदाणी यांच्यासारखं स्टार्टअप सुरु करायचं आहे. कारण, अदाणी ज्या व्यवसायाला हात लावतात, तो यशस्वी होतो. लोकं विचारायचं की, अदाणी कसं काय अनेक क्षेत्रांत पुढं जात आहेत. काही वर्षापूर्वी अदानींचे फक्त एक-दोन व्यवसाय होते.आता,आठ ते दहा व्यवसाय आहेत.” त्यानंतर महुआ मोइत्रा यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

अदानी यांनी देशाला फसवलं असल्याचा आरोप यावेळी महुआ यांनी केले आहे. त्यांनी अदानी यांचे अप्रत्यक्षपणे नाव घेत मोदी सरकारचे त्यांच्याशी असलेले हितसंबध यावर जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी काही अपशब्द वापरले, यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी महुआ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

“कोणत्याही रस्त्याने चालत जावा, तर अदाणींचं नाव पुढं येत. हिमाचल आणि काश्मीरमधील सफरचंद सुद्धा अदाणींचं आहेत. अदाणी आणि पंतप्रधानांचं संबंध काय आहेत? मी सांगतो, काही वर्षांपूर्वी नरेंद्र मुख्यमंत्री असताना अनेकांनी मोदींचा विरोध केला. पण, तेव्हा अदाणी मोदींच्या बाजूने उभे राहिले.” असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. अदानी आणि मोदींचे काही फोटोही गांधी यांनी संसदेत दाखवले.

राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान केंद्र सरकारवर जोदार हल्ला चढवला. भारत जोडो यात्रे दरम्यान आलेल्या अनुभवांचा दाखला देत राहुल गांधी यांनी हिंडनबर्ग रिपोर्ट , गौतम अदानी ,देशातील महागाई, बेरोजगारी आणि इतर अनेक मुद्द्यांवरुन केंद्र सरकारला घेरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत एनडीए सरकारच्या मंत्री आणि सत्ताधारी सदस्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा सदस्य ओम बिरला यांनी राहुल गांधी यांना पूर्ण वेळ बोलू दिले. त्याचा फायदा घेत राहुल गांधी यांनी चौफेर फटकेबाजी केली. आपल्या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.राहुल गांधी आणि महुआ यांनी केलेल्या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT