Kasaba By Election : 'उमेदवारी अर्ज मागे घ्या, अन्यथा..' ; कसब्यातील उमेदवाराला धमकी

Kasaba By Election : बिचकुले यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.
Kasaba By Election Abhijeet Bichukale
Kasaba By Election Abhijeet Bichukale sarkarnama

Abhijeet Bichukale Kasaba By Election : पुण्यात २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु आहे. भाजपकडून हेमंत रासने, तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांनी अर्ज भरला आहे. यात काल (मंगळवारी) बिग बाँस फ्रेम अभिजित बिचकुले (Abhijeet Bichukale)यांनीही अर्ज दाखल केला आहे.

भाजपाच्या मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा जागेवर आता पोट निवडणूक होत आहे. भाजपकडून कसब्याची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु असताना बिचकुलेंनी एन्ट्री केली आहे. आज त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Kasaba By Election Abhijeet Bichukale
MNS : ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत..; ठाकरेंचं सासर अन् आजोळ मनसेच्या रडारवर

मंगळवारी त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज (बुधवारी) त्यांना धमकी देण्यात आली आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना धमकी देण्यात आली आहे. बिचकुले यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.

Kasaba By Election Abhijeet Bichukale
Pune News : तलाठ्यासाठी मदतनीसाने मागितली ३५ हजाराची लाच, तलाठी गोत्यात..

कसबा पेठ मधून अभिजित बिचुकले यांनी पत्नी अलंकृता साठी उमेदवारी अर्ज घेतला असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती, पण मंगळवारी स्वतः अभिजित बिचुकले यांनीच अर्ज दाखल केला आहे. राजकारणासोबतच बिग बॉस मराठी, हिंदी मध्येही बिचुकले यांनी एन्ट्री घेत धमाल उडवून दिली होती.

आमदार, खासदार ते अगदी राष्ट्रपतीच्या निवडणूका त्यांनी लढविल्या आहेत. यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात अभिजित बिचुकले उभे राहिले होते.

'मी कसबा पेठेत राहतो. येथील प्रश्न देखील माझे आहेत. जो पर्यंत मी विधानसभा / संसदेमध्ये जात नाही तो पर्यंत निवडणूक लढणार'असे त्यांनी काल सांगितले आहे. आज अर्ज छाननीचा दिवस आहे. २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. निकाल २ मार्च रोजी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com