Rahul Gadhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : प्रयागराजमधून राहुल गांधींचा थेट हल्लाबोल; म्हणाले,'विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढाई ...'

Rahul Gandhi interaction News : येथील विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्या आपण संसदेत आक्रमकपणे मांडू आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ही लढाई सुरूच राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

Sachin Waghmare

Mumbai News : प्रयागराज येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेचे खासगीकरण आणि सामाजिक न्याय (जाती जनगणना) या मुद्द्यांवरून केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. प्रयागराज हे 'स्पर्धा परीक्षांचे केंद्र' मानले जाते. येथील विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्या आपण संसदेत आक्रमकपणे मांडू आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ही लढाई सुरूच राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यूपीएससी, यूपीपीसीएस आणि नीट सारख्या परीक्षांच्या वारंवार होणाऱ्या पेपर फुटीवर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चिंता व्यक्त केली. आजचा युवा दिवस-रात्र मेहनत करून अभ्यास करतो, पण ऐनवेळी पेपर लीक होतो. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

परीक्षा घेणाऱ्या संस्था स्वायत्त न राहता राजकीय दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप त्यांनी करीत निवडणूक आणि संस्थांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. रोजगाराची संधी नाही त्यामुळे देशातील तरुण पदव्या हाताशी धरून बसले आहेत, परंतु त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील तरुण केवळ स्पर्धा परीक्षांच्या दुष्टचक्रात अडकला आहे, तर सर्व सरकारी संपत्ती आणि मोठे कंत्राट मोजक्याच उद्योगपतींच्या हातात दिले जात आहेत. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देतात ते काही कामाचे नाही. युवकांना चक्रव्यूहमध्ये फसवले जात आहे. हजारातील फक्त १२ जणांना कायमस्वरूपी नोकरी मिळत असल्याची टीका ही राहुल गांधी यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT